बार्शी – येथील वीरशैव विद्या संवर्धिनी मंडळाच्या संस्थेच्यावतीने दि १३ ते १५ सप्टेंबर रोजी दररोज सायं ६ वाजता लिंगायत बोर्डींग येथे तीन दिवशीय व्याख्यानमालेचे आयोजन केल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष रावसाहेब मनगिरे यांनी दिली.
यावेळी वीरशैव विद्या संवर्धिनी मंडळ संस्थेचे सचीव शिवलींग मठपती संचालक ॲड. सचीन शेटे प्रभुलिंग स्वामी गिरिष बरिदे विवेक देवणे आदी उपस्थित होते.
यावेळी मनगिरे म्हणाले या संस्थेच्या माध्यमातुन आजवर नामांकित वक्त्यांनी व्याख्यानमालेत आपले विचार व्यक्त केलेले आहेत. शुक्रवार दि १३ सप्टेंबर रोजी डॉ. गणेश शिंदे यांचे जीवन सुंदर आहे ” या विषयावर व्याख्यान होणार आहे.
शनिवार दि १४ सप्टेंबर रोजी. सिने अभिनेते तसेच आई कुठे काय करते” मालिकेतील आप्पाची भुमिका साकरणारे किशोर महाबोले यांची प्रकट मुलाखत निवेदिका ममता बोल्ली या घेणार आहेत
तर रविवार दि. १५ सप्टेंबर रोजी व्याख्याते संजय कळमकर यांचे ‘हसण्यासाठी जन्म आपुला या विषयावर व्याख्यान होणार आहे.
तरी हि व्याख्यानमाला असुन या व्याख्यानमालेच्या बौद्धिक मेजवानीसाठी सर्वानी उपस्थीत रहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब मनगिरे यांनी केले आहे
More Stories
कृषी पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार
नागपूर प्रेस क्लब येथे पत्रकारांसाठी विशेष व्याख्यान; आपली पत्रकारिता ‘रिअलटाईम’ करण्यासाठी ‘एआय’ उपयुक्त – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह
विधानसभा तालिका सभाध्यक्षांची नियुक्ती जाहीर