Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > कृषी व पशुसंवर्धन > संवर्धन समिती बार्शी, गौरी गणपती पर्यावरण संवर्धन सजावट स्पर्धा 2024

संवर्धन समिती बार्शी, गौरी गणपती पर्यावरण संवर्धन सजावट स्पर्धा 2024

संवर्धन समिती बार्शी गौरी गणपती पर्यावरण संवर्धन सजावट स्पर्धा 2024
मित्राला शेअर करा

सुख शांती आणि समृद्धी बरोबर घेऊन येणाऱ्या गौरी गणपतीच्या सणाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देत गत वर्षी प्रमाणे याही वर्षी जे कुटुंबीय आपल्या गौरी गणपती समोर पर्यावरण रक्षण तसेच संवर्धन याविषयी जागरूकता निर्माण करणारे देखावे साजरे करून त्यानिमित्ताने समाज प्रबोधनाचे सत्कार्य करतील अशा कुटुंबीयांचा वृक्ष संवर्धन समिती बार्शी यांच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात येणार आहे.

या स्पर्धेविषयी काही महत्वाच्या सूचना वृक्ष संवर्धन समितीच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

▪︎ १ . स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपणाला आपल्या गौरी गणपतीच्या पर्यावरण पूरक सजावटीचे चार फोटो आणि एक मिनिटाचा व्हिडिओ खाली दिलेल्या संपर्क नंबर वरती बुधवार दिनांक ११ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी दहा वाजेपर्यंत पाठवायचा आहे.
▪︎ २.यामधील पहिल्या तीन उत्कृष्ट देखाव्यांना ट्रॉफी देऊन त्या सहभागी कुटुंबीयांचा उचित सन्मान करण्यात येईल.
▪︎ ३.यातील काही देखाव्यांचे मोजके व्हिडिओ वृक्ष संवर्धन समिती या फेसबूक पेजवरून प्रसारित करण्यात येणार आहेत.
▪︎ ४.प्रत्येक सहभागी स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

सहभागासाठी संपर्क

▪︎ १.डॉ.सचिन चव्हाण सर: 9552094373
▪︎ २.आनंद धुमाळ सर: 8275917059
▪︎ ३.संदीप पवार सर 7385983300

सहभागासाठी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन
वृक्ष संवर्धन समिती बार्शी यांच्या वतीने करण्यात आले आहे.