तत्कालीन मुंबई राज्य सरकारने, स्वर्गीय मोरारजी देसाई गृहमंत्री असताना, राज्य परिवहन बॉम्बे नावाची स्वतःची राज्य रस्ते वाहतूक सेवा सुरू केली. आणि यासह, पहिली निळ्या आणि चांदीच्या रंगाची बस पुण्याहून अहमदनगरला निघाली ती एसटी आजपर्यंत धावत आहे.
ही धावाधाव करत असताना कधी नफा तोटा पहिला नाही कधी श्रीमंत गरिब पाहिला नाही, ना कधी दिवस, रात्र, उन्हाळा पावसाळा की हिवाळा. प्रवाश्यांना इच्छित गावी पोहोचवणे हेच ध्येय समोर ठेऊन ती आज ही ताट मानेने धावत आहे. काळा प्रमाणे वागले पाहिजे हे ध्यानात घेऊन ती म्हणजे एसटी. काळ बदलेल तसे ती ही बदलत गेली.
नव्या खाजगी आधुनिक वातानुकूलित आराम गाड्यांचे आव्हान स्वीकारत एसटीच्या नव्या लालपरीचा लूक अखेर आला समोर
तामिळनाडूमधील तिरुचिरापल्ली येथे असलेलेल्या अशोक लेलँडच्या बस बांधणी कंपनीला एसटी महामंडळाचे MD यांनी भेट दिली असता, आगामी काळात येणाऱ्या २२००+ साध्या बसेसपैकी पहिली प्रोटोटाइप बस तयार झाली असून, सदर बसचा फ्रेश लूक त्यांनी एम. एम. आर. डि च्या सर्व सोशल मीडिया पेजवर शेअर केला आहे.
More Stories
कृषी पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार
नागपूर प्रेस क्लब येथे पत्रकारांसाठी विशेष व्याख्यान; आपली पत्रकारिता ‘रिअलटाईम’ करण्यासाठी ‘एआय’ उपयुक्त – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह
विधानसभा तालिका सभाध्यक्षांची नियुक्ती जाहीर