बार्शी, ता 10: आगळगाव येथील लोकसेवा विद्यालयातील विद्यार्थी आदर्श विजय कोल्हे याची अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यासाठी निवड झाली आहे. यापूर्वी तालुका, जिल्हा व विभाग स्तरावरती कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावरील विज्ञान वक्तृत्व स्पर्धेत त्याने नंबर मिळवला आहे.
विज्ञान शिक्षिका एम पी नाईकनवरे यांचे त्याला मार्गदर्शन लाभले. आदर्श कोल्हे याचा सत्कार व कौतुक कुसळब केंद्र प्रमुख डॉ विलास काळे, जावेद सर, अतुल बोराडे, इम्रान शेख, मुख्याध्यापिका एपी जोगदंड व सर्व शिक्षक यांनी केला
त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर बी वाय यादव उपाध्यक्ष नंदन जगदाळे जनरल सेक्रेटरी पी. टी. पाटील. जॉईन्ट सेक्रेटरी अरुण देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे, गटशिक्षणाधिकारी सुहास गुरव साहेब, अध्यक्ष डी. एम. मोहिते, अध्यक्ष प्रफुल्ल ओमन, मुख्याध्यापिका ए. पी. जोगदंड, सरपंच पुतळाताई गरड व ग्रामस्थांनी त्याचे अभिनंदन केले.
More Stories
बियाणे, औषधे व खते यासाठी महा डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन
पुण्याच्या एमआयटी विद्यापीठाचा जेष्ठ संपादक राजा माने यांना ‘समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर