बार्शी तालुक्याचे मा. आमदार श्री. राजेंद्र विठ्ठल राऊत यांना मराठा समाजाच्या आंदोलनासाठी आरक्षणासाठी जे पाऊल उचलेले आहे
त्या आरक्षणा संदर्भात करत असलेल्या मा. आमादार श्री. राजेंद्र विठ्ठल राऊत यांच्या अंदोलनाला व विधानसभेचे अधिवेशन बोलवावे या मागणीला एल्गार जनरल कामगार संघटना बार्शी यांनी जाहीर पाठींबा दिला आहे.
तसेच संघटनेतील सदस्यांचा श्री. मा. आ. राजेंद्र विठ्ठल राऊत यांना जाहीर व सक्रिय पाठिंबा जाहीर करुन आम्ही श्री. राजेंद्र विठ्ठल राऊत साहेब यांच्या खंबीर पाठीशी आहोत अशी माहिती संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांनी यावेळी संघटनेच्या पत्रासह दिली.
यावेळी संघटनेचे बार्शी शहर प्रमुख विश्वनाथ सोमनाथ फुले, सचिव अजय बिटू शिंदे, तालुकाध्यक्ष राम शिंदे, तालुका उपाध्यक्ष सूरज काटकर, महिला तालुका उपाध्यक्ष शीतल घोलप, सहसचिव कोमल गणेश शिंगाडे, खजिनदार महेश भगवान घोलप, संघटक सुरेखा अण्णा झांबरे, सल्लागार अनिल चव्हाण उपस्थित होते.
More Stories
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सूचना: केवायसी प्रक्रिया तातडीने करा!
बार्शी येथे मनशक्ती प्रयोग केंद्राची आरोग्यप्राप्ती, रोगमुक्ती कार्यशाळा संपन्न