केंद्रीय सूक्ष्म,लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे व केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.कराड यांची आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्त्वाखाली बार्शीतील उद्योजकांच्या शिष्टमंडळाने घेतली भेट. बार्शी एम.आय.डि.सी.निर्माणला गती व चालना देण्याकरिता केंद्र सरकारच्या वतीने सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय सूक्ष्म,लघु व मध्यम उद्योग मंत्री मा.ना.नारायण राणे यांनी दिले.त्याचबरोबर बार्शीत नवीन उद्योग निर्मितीसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत,सबसिडी,सवलती देऊन नवीन उद्योजकांना प्रोत्साहन देण्याची ग्वाही आमदार राजेंद्र राऊत व उद्योजकांच्या शिष्टमंडळास दिली.बार्शीत नवीन उद्योग निर्मितीचे प्रस्ताव उद्योजकांनी केंद्रीय उद्योग खाते व अन्न उद्योग प्रक्रिया खात्याकडे सादर करावेत.या नवीन उद्योगांमुळे नवीन रोजगार निर्मिती होवून,तेथील तरुणांना रोजगार उपलब्ध होण्यासही नक्कीच मदत होईल,असे मत नारायण राणे यांनी बार्शीच्या उद्योजक शिष्टमंडळ भेटीत व्यक्त केले.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मा.डॉ.भागवत कराड यांची, आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्त्वाखाली बार्शीतील उद्योजकांच्या शिष्टमंडळाने घेतली भेट.
बार्शीच्या उद्योग विश्वाला चालना देण्यासाठी भागभांडवल उभारणी व आर्थिक तरतुदी करून सहकार्य करण्याची हमी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मा. डॉ.भागवत कराड यांनी दिली.
बार्शीतील लघु उद्योजकांसमोर (दाळ मिल कारखानदार,चिंच चिंचूका प्रक्रिया, पी.व्ही.सी. पाईप कारखाना,इत्यादी उद्योग) सद्यस्थितीतील असलेल्या अडचणी, भागभांडवलाची गरज, मोठमोठ्या बँकांची मदत मिळावी याकरिता केंद्रीय अर्थ खात्यामार्फत लघु उद्योजकांसाठी विशेष आर्थिक तरतुदी करून,भागभांडवल उभारणीसाठी बॅंकांमार्फत सहकार्य करण्याची मागणी,आमदार राजेंद्र राऊत यांच्या सोबत बार्शीच्या उद्योजक शिष्टमंडळाने केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मा.डॉ.भागवत कराड यांच्याकडे केली.
या मागणीस त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन लघु उद्योग निर्मिती व रोजगार निर्मितीसाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून नक्कीच मदत केली जाईल असे आश्वासन आमदार राजेंद्र राऊत व उद्योजकांच्या शिष्टमंडळास दिले.
यावेळी अरुण दादा बारबोले,युवा उद्योजक धनंजय घोलप,अतुल सोनिग्रा,मनोहर सोमाणी,अविनाश बागमार,संतोष बोगावत, उपस्थित होते.
More Stories
नागपूर प्रेस क्लब येथे पत्रकारांसाठी विशेष व्याख्यान; आपली पत्रकारिता ‘रिअलटाईम’ करण्यासाठी ‘एआय’ उपयुक्त – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह
वृक्ष संवर्धन समिती बार्शी च्या “वृक्ष संवर्धन दिनदर्शिका २०२५” चा प्रकाशन सोहळा संपन्न
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान