बार्शी : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शीच्या महाराष्ट्र उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये बारावीच्या परिक्षेत प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी संस्था सचिव प्रकाश पाटील, खजिनदार जयकुमार शितोळे,सदस्य बी. के.भालके,दानशूर भगिनी ज्योत्सना पाटील आणि शैलजा पाटील, प्राचार्य जी.ए.चव्हाण,उपप्राचार्य एल.डी.काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक किमान कौशल्य विभागाचे प्राध्यापक किरण गाढवे यांनी केले
प्रारंभी संस्थापक कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले.
बार्शीतील पाटील भगिनींनी गुरु ऋणातून उतराई होण्याच्या भावनेतून महाविद्यालयास दिलेल्या एक लाख रुपयांच्या देणगीतून दरवर्षी सर्व शाखेमधील गुणवंत विद्यार्थ्याचा रोख पारितोषिके देऊन सत्कार केला जातो.
यावेळी कला शाखेतून महाविद्यालयात प्रथम आलेल्या सुफिया इक्बाल शेख,व्दितीय राहुल दत्तात्रय महानवर,तृतीय कृष्णा भारत तुपसमिंदर विज्ञान शाखेतून प्रथम आलेल्या श्रुती नाना दळवी,वैष्णवी सतीश जाधवर,व्दितीयआलेल्या ऋतुजा राहुल अपसिंगकर,अविष्कार आबासाहेब पाटील,चैतन्य महादेव धस,तृतीय आलेल्या सुदर्शन महेश कांबळे,व्होकेशनल विभागातून प्रथम आलेल्या अनिकेत अनिल कुलकर्णी, व्दितीय अभिषेक सोमनाथ दाभाडे,तृतीय सागर शाम शहाणे यांचा मान्यवरांच्या हस्ते रोख रकमेची पारितोषिक देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांच्यावतीने सुफिया शेख,अविष्कार पाटील,श्रुती दळवी,चैतन्य धस, सुदर्शन कांबळे,अनिकेत कुलकर्णी तर पालकांच्यावतीने राहुल अपसिंगकर,महेश कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.जयकुमार शितोळे आणि प्रकाश पाटील यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत उपस्थितांना समयोचित मार्गदर्शन केले.आभार प्रदर्शन प्रा. रमण गोणेकर यांनी तर सूत्रसंचालन प्रा.संजय बागल यांनी केले.
यावेळी प्रा.एस.एस. गायकवाड,प्रा.रवी पाटील,प्रा.सज्जनराव देशमुख,प्रा.विजय जगदाळे,प्रा.उमेश क्षीरसागर,प्रा.गणेश राऊत,प्रा. संपत कदम, प्रा.बालाजी फरताडे,प्रा.गणेश घावटे,प्रा.जयश्री पाटील,प्रा.पूजा पाटील आदी शिक्षकवृंद, इतर कर्मचारीवर्ग,पालक,विद्यार्थी आदी उपस्थित होते.
More Stories
बियाणे, औषधे व खते यासाठी महा डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन
पुण्याच्या एमआयटी विद्यापीठाचा जेष्ठ संपादक राजा माने यांना ‘समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर