केंद्रशासन व राज्यशासनाच्या अनेक योजना असतात पण बर्याच योजना आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत किंवा आपण योजने पर्यंत पोहोचत नाही.
‘असा ‘ करा अर्ज
Pragati Scholarship Scheme 2021 : देशातील मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी, AICTE तंत्रज्ञानात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या गरीब कुटुंबातील शिकण्याची इच्छा Pragati Scholarship Scheme 2021 : देशातील मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी, AICTE तंत्रज्ञानात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देते.याअंतर्गत AICTE तर्फे ४ हजार मुलींना प्रत्येकी ३० हजार रुपये दिले जातात. एआयसीटीई प्रगती शिष्यवृत्तीसाठी अर्ज दरवर्षी ऑगस्ट / सप्टेंबरमध्ये सुरू होतात.
एआयसीटीई शिष्यवृत्तीसाठी कोणतीही प्रवेश परीक्षा घेतली जात नाही गरीब कुटुंबातील शिकण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थीनींसाठी ही शिष्यवृत्ती फायदेशीर आहे.प्रगती शिष्यवृत्ती योजना २०२१ अंतर्गत मुलींना शिक्षणात मदत मिळते. देशातील तरुण मुलींचे ज्ञान,कौशल्य वाढवणे यामुळे त्या देशाच्या विकासात योगदान देऊ शकतील हे प्रगती शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे पात्रता एआयसीटीईने मान्यताप्राप्त महाविद्यालयातून डिप्लोमा किंवा पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या असलेल्या विद्यार्थीनींना ही शिष्यवृत्ती मिळू शकते.शिक्षण शुल्क माफीसाठी उमेदवाराची निवड झाली तर त्यांना उमेदवारांना पुस्तके,लॅपटॉप आणि डेस्कटॉप खरेदी करण्यासाठी दरवर्षी ३० हजार रुपये दिले जातात.
प्रगती शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे खालील पात्रता असणे शिष्यवृत्तीसाठी पात्रता फक्त मुलगी यासाठी अर्ज करू शकते.अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.अर्ज करणारी मुलगी ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन ( एआयसीटीई ) द्वारे मान्यताप्राप्त कॉलेज, इन्स्टिट्यूट किंवा विद्यापीठात प्रथम वर्षाची विद्यार्थीनी असावी. भारताच्या कोणत्याही राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाचे कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदाराच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असावे.कुटुंबात एकापेक्षा जास्त मुली असतील तर सर्व मुली एआयसीटीई प्रगती शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेऊ शकतात.
Pragati Scholarship 2021 : असा करा अर्ज
AICTE च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या सर्वप्रथम तुम्हाला नोंदणी करावी लागेल.नोंदणी केल्यानंतर तुम्हाला आयडी आणि पासवर्ड मिळेल. आयडी आणि पासवर्डच्या मदतीने लॉगिन करा. एआयसीटीई प्रगती शिष्यवृत्ती योजनेमध्ये लॉगिन केल्यानंतर तुम्हाला योजनेमध्ये लॉगिन केल्यानंतर तुम्हाला प्रगती शिष्यवृत्ती योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी एक फॉर्म मिळेल .त्या फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती भरा.सर्व माहिती काळजीपूर्वक भरल्यानंतर त्यात विचारलेली इतर कागदपत्रे अपलोड करा. कागदपत्रे अपलोड केल्यानंतर फॉर्म सबमिट करा.अर्ज निवडला गेल्यावर तुम्हाला मोबाईल आणि ईमेल आयडी द्वारे कळवले जाईल.प्रगती स्कॉलरशीपची माहिती मिळविण्यासाठी क्लिक करा.
More Stories
कृषी पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार
नागपूर प्रेस क्लब येथे पत्रकारांसाठी विशेष व्याख्यान; आपली पत्रकारिता ‘रिअलटाईम’ करण्यासाठी ‘एआय’ उपयुक्त – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह
वृक्ष संवर्धन समिती बार्शी च्या “वृक्ष संवर्धन दिनदर्शिका २०२५” चा प्रकाशन सोहळा संपन्न