Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > छत्रपती शिवाजी विद्यालय, वाशी येथे तालुका विधी सेवा समिती व विधीज्ञ मंडळ, यांच्ये विधी साक्षरता शिबिर संपन्न

छत्रपती शिवाजी विद्यालय, वाशी येथे तालुका विधी सेवा समिती व विधीज्ञ मंडळ, यांच्ये विधी साक्षरता शिबिर संपन्न

मित्राला शेअर करा

छत्रपती शिवाजी विद्यालय, वाशी.येथे तालुका विधी सेवा समिती, वाशी व विधीज्ञ मंडळ , वाशी. यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त विधी साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले.

दि ११ ऑक्टोबर २०२१ वार सोमवार रोजी छत्रपती शिवाजी विद्यालय वाशी. येथे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त विधी साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस.व्ही. गाढवे ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा होत्या.तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री.सं मा कोळेकर (दिवाणी न्यायाधीश क.स्तर वाशी तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती वाशी)उपस्थित होते तसेच श्रीमती एस. आर. देशमुख विधिज्ञ ,श्रीमती ए. एस. कुंभार विधिज्ञ, श्री एस एन कावळे विधिज्ञ ,श्री व्ही एम दाणी विधिज्ञ, श्री व्ही व्ही जगताप विधिज्ञ अ‍ॅडव्होकेट. प्रदीप देशमुख, कपिल राज मसणे तसेच पोलीस कर्मचारीही ऊपस्थित होते.


कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले व कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री.सं मा कोळेकर (दिवाणी न्यायाधीश क.स्तर वाशी तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती वाशी) व श्री एस एन कावळे विधिज्ञ यांनी विद्यार्थ्यांना कायदेविषयक माहिती सांगितली.
याप्रसंगी विद्यालयातील NMMS( राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा) परीक्षेतील धारक विद्यार्थी तसेच मंथन परीक्षेतील धारक विद्यार्थी व बेटी बचाव बेटी पढाव या अभियानांतर्गत घेतलेल्या चित्रकला स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

गुणवंत विद्यार्थ्यांची नावे

NMMS परीक्षा

कु. शेंडगे अंकिता रामेश्वर

मंथन परीक्षेतील गुणवंत

प्रसाद काकासाहेब गवारे
वैष्णवी परमेश्वर तुंदारे
श्लोक शिवशंकर राऊत
श्रेया बापूसाहेब सावंत
राजनंदिनी अमोल भोसले

चित्रकला स्पर्धा
प्राथमिक गट ( इ ५ वी ते ७ वी)
शाहीन मेहराज काझी
केतकी दिनेश वास्कर
वेदांत वैजनाथ डुकरे
अन्वी ओमप्रकाश चौधरी
श्रेयश संतोष भवर

माध्यमिक गट ( इ ८ वी ते १० वी)
प्रणव प्रवीण उंदरे
वैष्णवी लक्ष्मण शिंदे
निशांत हरिश्चंद्र गायकवाड
अल्सबा याकुब शेख
वरद शहाजी कागदे

कार्यक्रमाचा समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती एस. व्ही. गाढवे यांच्या अध्यक्षीय भाषणाने झाला.

याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री कांबळे बी. डी. यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री छबिले एस.बी. व श्री धारकर एस. एस. यांनी केले. आभार कांबळे पी. ए. यांनी मानले.
याप्रसंगी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.