सुरुवातीला पेशंट फिट येणे, बोलताना अडखळत बोलने या तक्रारी घेऊन जगदाळे मामा हॉस्पिटल चे प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. किशोर गोडगे यांच्याकडे आला.प्राथमिक तपासणीमध्ये पेशंटच्या मेंदूच्या डाव्या बाजूला बोलण्याच्या भागामध्ये ट्यूमर आढळला.
डॉ गोडगे यांनी पेशंटची गाठ काढण्याचा निर्णय घेतला. परंतू अडचण अशी होती की ट्युमर हा बोलण्याच्या भागात असल्याने ऑपरेशन दरम्यान पेशंट ची वाचा जाण्याची शक्यता असते.म्हणजेच रुग्णाचे बोलण्याची क्रिया कायमची बंद होऊ शकते.
म्हणून पेशंट ला जागे ठेऊन,म्हणजेच (Awake Craniotomy ) त्याच्याशी शस्त्रक्रिया करताना संवाद साधत ही अतिअवघड शस्त्रक्रिया म्हणजेच Awake Craniotomy यशस्वी पार पडली. शस्त्रक्रियेदरम्यान न्युरोसर्जन डॉ किशोर गोडगे व त्यांच्या इतर डॉक्टर च्या चमू ने कोणत्याही अडचणी शिवाय ट्युमर काढला.
या अवघड शस्त्रक्रियेसाठी भुलतज्ञ डॉ संदीप कांदे, डॉ सीमा जाधव, व सहकारी श्रीकांत सोरेगावकर, सुभाष माने, हेमंत लांडे यांनी पार पाडली. तसेच विशेष सहकार्य डॉ अमोल जाधव व डॉ राहुल बंडेसोडे यांचे लाभले. तसेच विशेष मार्गदर्शन डॉ यादव सर व जगताप सर यांचे लाभले.
अशा शस्रक्रिया वैद्यकीय क्षेत्रात मैलाचा दगड मानतात.
बार्शीचे नाव वैद्यकीय क्षेत्रात प्रसिद्ध झाले आहे. जगदाळे मामा हॉस्पिटलचे जागतिक पातळीवर आद्ययावत ट्रामा केयर युनिट सुरू होत आहे त्या पार्श्वभूमीवर न्युरोसर्जन डॉ किशोर गोडगे व सहकारी डॉ चे सर्व स्तरांमधून व शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात आले आहे.
More Stories
कृषी पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार
नागपूर प्रेस क्लब येथे पत्रकारांसाठी विशेष व्याख्यान; आपली पत्रकारिता ‘रिअलटाईम’ करण्यासाठी ‘एआय’ उपयुक्त – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह
विधानसभा तालिका सभाध्यक्षांची नियुक्ती जाहीर