पिंपरी – चिंचवड महिला लघुउद्योजक संघटनेच्यावतीने शहरातील महिला उद्योजकांसाठी एमआयडीसीमध्ये स्वतंत्र गाळ्याच्या मागणीसाठी महापालिका आयुक्त राजेश पाटील व महापौर उषा ढोरे यांना नुकतेच निवेदन देण्यात आले
पिंपरी – चिंचवड परिसरात अनेक छोटे – मोठे व्यवसाय उद्योग करणाऱ्या महिलांचा समुदाय आहे. परंतु,महिलांना व्यवसायांसाठी जागेची कमतरता भासत आहे. रहिवासी भागात उद्योग करण्यास थ्री फेज कनेक्शन,किंवा औद्योगिक परवाने मिळवताना येणार्या अडचणी सारख्या अनेक त्रुटी जाणवतात . त्यामुळे , महिला उद्योग मोठ्या प्रमाणात वाढू शकत नाहीत. लघु उद्योजक संघटनेतर्फे महिलांसाठी ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठी संधी आहे परंतु त्यासाठी महिला उद्योजिकांना योग्य त्या सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे असे पिंपरी – चिंचवड महिला लघुउद्योजक संघटना तसेच दुर्गा ब्रिगेड च्या अध्यक्षा दुर्गा भोर यांचे म्हणणे आहे.

यावेळी पिंपरी – चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, महापौर उषा ढोरे महिला लघुउद्योजक संघटनेच्या अध्यक्षा दुर्गा भोर, सुषमा पठारे, रश्मी ओहरी अर्पिता चौगुलवार , सुनीता कलोला रुपाली होनकळस , मीनाक्षी गिरी,अॅड पद्मजा गोवित्रीकर व अर्पिता चौगुलवार आदी उद्योजिका उपस्थित होत्या. निवेदनात म्हटले आहे , की महापालिका परिसरात अनेक छोटे मोठे उद्योग करणाऱ्या महिलांचा मोठा समुदाय आहे. परंतु, एमआयडीसीमध्ये महिला व्यावसायिकांसाठी जागेची कमतरता भासत असून, रहिवासी भागात सुरू असलेल्या उद्योगांना श्री फेज कनेक्शनसारख्या त्रुटी जाणवतात त्यामुळे महिलांसाठी स्वतंत्र गाळे देण्यात यावेत, अशी मागणी लघुउद्योजक संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.
त्यांच्या या मागणीचा महापालिकेने विचार करावाच त्याचबरोबर शासनाने सुद्धा दुर्गा भोर यांचे निवेदन विचारात घेऊन या संदर्भातील योजना अमलात असल्यास राज्यभरातील महिला उद्योजिकांना याचा फायदा होऊ शकेल.
More Stories
बार्शीपुत्र सुजित मुंढेंच्या ‘पोलीस प्रशासन व नागरिक सेवा’ पुस्तकाचे शिवाजी विद्यापीठात प्रकाशन
कलाशिक्षक संघटनेतर्फे शिक्षण मंत्र्यांना मागण्यांचे निवेदन सादर
महाराष्ट्र विद्यालयात नवीन प्रवेश घेतलेल्या इयत्ता पाचवी मधील विद्यार्थ्यांच्या पालकांची शिक्षक-पालक सभा उत्साहात संपन्न