अलिकडे मोबाईलच्या किमतीचा विचार करता साधारण 1000 हजार रुपयांच्या पुढेच आहेत तर काही मोबाईल लाखांच्या घरात सुद्धा आहेत अणि त्यामुळे मोबाईल चोरीस जाण्याचे प्रमाण सुद्धा वाढत आहे विशेषतः बस स्टँड, रेल्वे स्टेशन, भाजी मंडई, अश्या गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरीचे प्रकार घडताना दिसून येतात, किंवा काहीवेळा आपल्या हातून सुद्धा मोबाईल गहाळ होतो किंवा पडतो विसरतो आणि कोणाच्या तरी हाती लागतो अश्या वेळी मोबाईल सापडलेला व्यक्ती प्रामाणिक असेल तर स्वतः त्या व्यक्तीशी संपर्क करून परत करतो अशी उदाहरणे सुद्धा आपल्याला आजुबाजुला ऐकावयास मिळतात.
परंतु मोबाईल चोरीला गेल्यानंतर किंवा गहाळ झाल्यानंतर पुढे काय करायचे या विचारात पडतो अश्या वेळी आपण काय केले पाहिजे आपल्या मोबाईल फोन मध्ये असे अनेक फंक्शन असतात ज्यामुळे मोबाइल सुरक्षित राहतो. चोरीस गेला किंवा गहाळ झाला तरी लोकेशन सापडते अगदी त्या मोबाईल मधील सिम कार्ड बदलले तरीही परंतु बर्याच जणांना त्याबाबत माहिती नसते. मोबाइलमधील नवनवे तंत्रज्ञान समजून त्यासंबंधीचे सेटिंग आपल्या मोबाईलमध्ये करणे गरजेचे आहे व त्यामुळे सायबर पोलिसांनाही ट्रेकिंग ट्रेसिंग करणे सोपे जाते.
फोन चोरी झालाच तर सर्व प्रथम दुसऱ्याच्या मोबाइलवरून, लॅपटॉप किंवा नेट कॅफेमध्ये जाऊन मॅनेज युवर अकाउंटमधून डाटा प्रायव्हसीमध्ये गेले पाहिजे. तेथे सिक्युरिटीमध्ये जाऊन मोबाइल सर्च केला पाहिजे, मोबाइलचे लोकेशन सापडते बर्याच वेळा लोकांना आपल्या मोबाईल चा Google पासवर्ड अणि ईमेल आयडी लक्षात नसतो ही अडचण वेगळीच.
मोबाइल चोरी झाल्याचे लक्षात येईपर्यंत चोर तेथून पसार झालेला असतो आणि प्रथम तो मोबाईल स्विचऑफ करतो. असे प्रकार आपल्या आजुबाजुला घडत असतात यासाठी मोबाइलमधील माय ॲक्टिव्हिटी सेटिंग ऑन ठेवा ज्यामुळे सर्व डिव्हाइसची ॲक्टिव्हिटी ट्रॅक करता येतो.
तत्काळ पोलीस ठाण्यात संपर्क केला पाहिजे.
मोबाइल हरवल्यास किंवा चोरी झाल्यास संबंधितांना इतर काही गोष्टी करता येत नसतील तर त्यांनी तत्काळ संबंधित पोलीस ठाण्यात जावे. तेथे मोबाइल नंबर, आयएमईआय नंबर, मोबाइल बिलाची माहिती द्यावी लागेल. जेथे फोन हरवला अथवा चोरीला गेला त्या जागेचे नाव, पत्ता सांगावा, फोन कधी हरवला त्याची तारीख द्यावी लागेल यात महत्वाचे म्हणजे आपल्या मोबाईल खरेदीचे बिल पावती अणि मोबाईलचा बॉक्स जपून ठेवावा ज्यावर आय एम ई आय नंबर असतो.
ही पद्धत वापरा
https://ceir.gov.in/home/index.jsp
या वेबसाइटवर जावे लागेल . अणि विचारलेली माहिती म्हणजे तुमचे नाव आणि पत्ता टाका, यानंतर आधार कार्ड अपलोड करून सबमिट करा. फोनची माहिती मिळाल्यावर तुम्हाला कळविले जाते.
दहा महिन्यांत चोरीला गेले ६६ मोबाइल
सोलापूर शहरामध्ये जानेवारी २०२१ ते ऑक्टोबर २०२१ दरम्यान सात पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एकूण ६६ मोबाइल चोरीला गेल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. दाखल झालेल्या तक्रारींपैकी बहुतांश मोबाइल संबंधितांना मिळाले आहेत.
शहरातील मोबाइल चोरी
जानेवारी ११
फेब्रुवारी ०८
मार्च ०६
एप्रिल ०३
मे ०९
जून ०५
जुलै ०८
ऑगस्ट ०६
सप्टेंबर ०५
ऑक्टोबर ०५
गर्दीच्या ठिकाणी crowded places जाताना नागरिकांनी सावध असणे गरजेचे आहे. आपल्या मोबाइलवर लक्ष ठेवले पाहिजे. मोबाइल चोरीला गेल्यास तत्काळ संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी त्या अनुषंगाने तपास केला जाईल.
बापू बांगर,सोलापूर पोलीस उपायुक्त ( गुन्हे )
मोबाइल चोरीला गेल्यानंतर प्रथमत: न घाबरता धीर ठेवला पाहिजे. तत्काळ आपल्या गुगल अकाउंटवरून तपास केल्यास त्याची माहिती मिळू शकते. तरीही मोबाइल न मिळाल्यास पोलीस ठाण्यात जाऊन रीतसर तक्रार द्यावी,
शक्यतो मोबाइल सापडतो. त्यामुळे घाबरायचे कारण नाही असे सायबरतज्ज्ञ अविनाश पाटील यांनी सांगितले.
पोलिस आयुक्तालयाची नवी वेबसाईट पोलिसांत तक्रार नोंदविण्यासोबत इतरही सुविधा
More Stories
वृक्ष संवर्धन समिती बार्शी च्या “वृक्ष संवर्धन दिनदर्शिका २०२५” चा प्रकाशन सोहळा संपन्न
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद