माळीनगर येथील शौर्य ॲडव्हेंचर्स ग्रुपच्या मुलांनी दोन दिवसात ५ किल्ले पूर्ण केले दिनांक ११ व १२ डिसेंबर रोजी राजेंद्र गोपाळराव गिरमे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून मोहीम प्रमुख संजय पवार यांच्या नियोजनाखाली ही मोहीम आखली दोन दिवसात पाच किल्ले हे नाशिक गुजरात राज्याच्या सीमेजवळील आहेत सलोटा गड सेल्हर गड हरगड मुल्हेर गड मोरागड हे गड कोट कठिण श्रेणीत आहेत.
प्रत्येक गडकिल्ले साधारण साडेतीन ते चार हजार फूट उंचीचे आहेत या मोहिमेत सर्वात लहान ट्रॅकर सोलापूरचा देवांश शिरसागर हा सोलापूर वरून या मोहिमेत सामील झाला होता . देवांश याने शौर्य ॲडव्हेंचर्स ग्रुप माळीनगर यांच्यासोबत बरेच गड किल्ले व सुळके पार केले आहेत ही मोहीम करताना राजेंद्र गोपाळराव गिरमे यांनी प्रेरणा दिली.
१० तारखेस सकाळी सर्व विद्यार्थ्यास बरोबर घेऊन रंजनभाऊ गिरमे यांचा शुभेच्छा चा निरोप घेऊन रात्री ठिक ९ वा साल्हेर गड यांच्या पायथ्याशी मुक्कामास थांबून सकाळी ५ वा उठून साडे सहा वाजता सालोटा गड चढण्यास सुरुवात केली साधारण साडे अकरा वाजता गडावर पोहोचल्यानंतर विद्यार्थ्यांना गडाची माहिती सांगण्यात आली व गडावरील प्रवेशद्वार धान्याची कोठारं पाण्याच्या टाक्या व मारुतीचे मंदिर याची माहिती दिली. लगेच साडेबारा वाजता खिंडीत येऊन साल्हेर गड ह्या किल्यावर चढाई चालू केली साधारण तीन तासाने साल्हेर गडावर पोहचलो सरांनी साल्हेर किल्ल्यावर समोरासमोर लढाई झालेली सांगितले सुरत ची लूट व गडाचा इतिहास विद्यार्थ्यांना सांगण्यात आला
साधारण दीड – दोन तासांनी किल्ला उतरून मुक्कामाच्या जागी येऊन लगेच मुल्हेरवाडी येथे रात्री मुक्कामास गेलो बारा तारखेस सकाळी पाचला उठून मुल्हेर गडाची चढाई चालू करून मुल्हेर गडावरील बरेच अवशेष व पाण्याच्या टाक्या व मंदिरे विद्यार्थ्यांना दाखवण्यात येऊन फोटो काढण्यात आले तसेच या खिंडीतून हरगड किल्ल्यावर चढाई केली हरगड हा कठीण श्रेणीतील साधारण साडेचार हजार फूट असा हा किल्ला आहे त्या गडावर साधारण दहा फुटाची तोफ विद्यार्थ्यास दाखवण्यात आली गडावरील महादेवाच्या मंदिराचे दर्शन घेण्यात आले नंतर हरगड उतरण्यास सुरुवात करून मोरगड येथे जाऊन राजवाड्याचे अवशेष पाहून खाली उतरण्यास सुरुवात केली दोन दिवसात पाच किल्ले हा वेगळाच अनुभव मिळाल्यामुळे विद्यार्थी फार आनंदात होते .
More Stories
बार्शी बसस्थानक व आगाराच्या पुनर्बांधणीसाठी १४ कोटी ९९ लाख ५० हजार मंजूर :- आमदार राजेंद्र राऊत
तेर येथील नृसिंह नवरात्र महोत्सवाच्या रक्तदान शिबिरात 67 भक्तांचे रक्तदान
महाराष्ट्र विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती धावणे के.डी.मॅडम यांना ‘लायन्स क्लब बार्शी रॉयल तर्फे राष्ट्र शिल्पकार आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्रदान