राज्यात वेगाने वाढत असलेल्या कोव्हिड १९ व ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या पाहता समूह संसर्गाचा धोका टाळण्यासाठी व रोगाचा फैलाव रोखण्यासाठी राज्यातील सर्व कॉलेज ऑनलाईन पध्दतीने घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत .
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव राज्याच्या सर्व भागात सारख्या प्रमाणात नसल्याने व राज्यातील ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे अश्या भागातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालये सुरु करण्याबाबत स्थानिक स्तरावरुन मागणी होत आहे . त्यामुळे राज्यातील सर्व विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयांमध्ये कोव्हिड प्रतिबंधात्मक सर्वसाधारण उपाययोजना करुन विद्यार्थ्यांकरिता ऑफलाईन पध्दतीने नियमित वर्ग सुरु करणे विद्यार्थ्यांच्या हिताचे असल्याने, राज्यातील सर्व विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग सुरु करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. या अनुषंगाने राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालये, अभिमत विद्यापीठे , स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे , समूह विद्यापीठे, तंत्रनिकेतने व तत्सम शैक्षणिक संस्थांमधील नियमित वर्ग दिनांक १ फेब्रुवारी , २०२२ पासून प्रत्यक्षरित्या ऑफलाईन पध्दतीने सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे आहे.
विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालये ही ज्या आयुक्त, महानगरपालिका / नगरपालिका किंवाजिल्हाधिकारी तथा अध्यक्ष , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे अंतर्गत येतात, त्यांच्याशी कोव्हिड -१ ९ च्या आजाराचा स्थानिक पातळीवरील प्रादुर्भाव व स्थानिक परिस्थिती प्रतिबंधित प्रक्षेत्रांचे नियोजन व आरोग्यविषयक पायाभूत सुविधांची उपलब्धता या बाबी विचारात घेऊन , विद्यापीठे व महाविद्यालये सुरु करण्याबाबत सदर प्राधिकरणांशी विचारविनिमय करुन योग्य तो निर्णय संबंधित विद्यापीठाने त्यांच्या स्तरावर घ्यावा व त्यानुसार महाविद्यालयांना ऑफलाईन पध्दतीने सुरु करण्यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शक सूचना मानक कार्य प्रणाली ( एसओपी ) देण्यात यावी . ज्यांनी कोव्हिड 19 च्या लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत , अशा विद्यार्थी / विद्यार्थीनींना विद्यापीठ व महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आलीआहे. परंतु लसीकरण ( दोन्ही डोस ) न झालेल्या विद्यार्थी / विद्यार्थीनींना प्रत्यक्ष महाविद्यालयात उपस्थित राहता येणार नाही , त्यांना ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी असे सांगण्यात आले आहे.
विद्यापीठे / महाविद्यालयांच्या दि. १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत घेण्यात येणाऱ्या परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात याव्यात. या नंतर , घेण्यात येणाऱ्या परीक्षा ऑफलाईन / ऑनलाईन पध्दतीने घेण्याबाबत विद्यापीठांनी त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावयाचाआहे. विजेची अनुपलब्धता किंवा नेटवर्क कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे किंवा विद्यार्थी अथवा त्याचे कुटुंबीय कोरोना बाधित असल्यास किंवा आरोग्यविषयक इतर समस्यांमुळे विद्यार्थी परीक्षा देऊ शकला नाही तर अशा विद्यार्थ्याची ऑनलाईन / ऑफलाईन पध्दतीने पुनर्परीक्षा घेण्यात यावी. परीक्षेपासून कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
गोंडवाना विद्यापीठ , गडचिरोली, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ , जळगाव व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ , नांदेड या विद्यापीठांशी संलग्नित काही भागात नेटवर्क सेवा विस्कळीत असल्यास किंवा उपलब्ध नसल्यास संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन ऑफलाईन स्वरुपात या भागातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात याव्यात. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना येणाऱ्या संभाव्य अडचणी व शंकांचे निरसन करण्यासाठी विद्यापीठे / महाविद्यालयांनी हेल्पलाईनची व्यवस्था करावी. परीक्षा व्यवस्थितरित्या पार पाडण्याच्या दृष्टीने विद्यापीठांनी त्यांच्या संकेतस्थळावर परीक्षांचा अभ्यासक्रम , नमुना प्रश्नसंच , हेल्पलाईन नंबर , इत्यादी स्वयंस्पष्ट माहिती उपलब्ध करुन दयावी . विद्यापीठ / महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत विद्यापीठाने त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा. वसतीगृहे टप्प्याटप्प्याने सुरु करण्याबाबत संबंधित विद्यापीठ , संचालक , उच्च शिक्षण , महाराष्ट्र राज्य , पुणे व संचालक , तंत्र शिक्षण , महाराष्ट्र राज्य , मुंबई यांनी आढावा घेऊन व स्थानिक प्राधिकरणांशी विचारविनिमय करुन त्यांचे स्तरावर निर्णय घ्यावा व त्याप्रमाणे संबंधितांना उचित सूचना द्याव्यात . ज्या विद्यार्थी / विद्यार्थीनींनी कोव्हिड १ ९ ची लस घेतलेली नाही , त्यांच्याकरिता विद्यापीठाने संबंधित संस्थांचे प्रमुख / महाविद्यालयांचे प्राचार्य यांचे मदतीने स्थानिक जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून लसीकरणासाठी विशेष मोहिम राबवून लसीकरण प्राधान्याने पूर्ण करून घ्यावे . तसेच विद्यापीठ / महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे देखील लसीकरण प्राधान्याने करुन घ्यावे . ( ८ ) राज्यातील सुरु होणाऱ्या सर्व विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयांनी कोव्हिड 19 च्या व्यवस्थापनाबाबतचे राष्ट्रीय निदेश , कामांच्या ठिकाणांबाबतचे अतिरिक्त निदेश, राज्य शासनाने वेळोवेळी काढलेली मार्गदर्शक तत्त्वे किंवा मानक कार्य प्रणाली ( एसओपी ) तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना लागू राहतील असे निर्देश या शासन निर्णयात देण्यात आलेआहेत.
हा शासन निर्णय
www.maharashtra.gov.in
या शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
More Stories
रात्री 9:58 वाजता ISRO चीआणखी एक गगनभरारी!
डॉ.मामासाहेब जगदाळे यांच्या १२२ व्या जयंतीनिमित्त कर्मवीर बुद्धिबळ स्पर्धा संपन्न
श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी मध्ये रक्त तपासणी शिबीर संपन्न