Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > महाराष्ट्र > आर्टिस्ट फपाळ यांच्या घराघरात शिवजयंती उपक्रमाचे छत्रपती घराण्याकडून कौतुक

आर्टिस्ट फपाळ यांच्या घराघरात शिवजयंती उपक्रमाचे छत्रपती घराण्याकडून कौतुक

फलटणच्या सईबाईंच्या निंबाळकर घराण्यातील आत्ताचे त्यांचे वंशज भोजराज नाईक निंबाळकर यांनी बार्शीतील आर्टिस्ट श्री. फपाळ यांच्या शिल्प स्टुडीओ ला सदिच्छा भेट दिली फपाळ यांच्या शिवकार्याने अक्षरशः भारावून जाऊन आपल्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.
मित्राला शेअर करा

आपण ऐकलेय की बार्शीतील शिल्पकार पांडुरंग फपाळ यांनी आपल्या हातून काहीतरी शिवकार्य घडावे या भावनेने प्रेरित होऊन शिवजयंती उत्सव घराघरात ही संकल्पना ही संकल्पना समोर ठेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या एक हजार पेक्षा जास्त मूर्ती तयार करून त्यांनी व त्यांच्या पत्नी आणि मुलांनी स्वतः तयार करून शहरातील विविध भागातील रहिवाशांना विषेशतः महिलांना मोफत वितरित केल्या. त्यांच्या या कार्याची दखल टीव्ही चॅनेलवर घेतली गेली.

फलटणच्या सईबाईंच्या निंबाळकर घराण्यातील आत्ताचे त्यांचे वंशज भोजराज नाईक निंबाळकर यांनी फपाळ यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.

यावेळी निंबाळकर यांनी ʼएक मूर्ती माझ्या घरी पूजनासाठी द्याल काʼ अशी विचारणा केली त्यावेळी फपाळ यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. यावेळी निंबाळकर यांनी विविध विषयांवर चर्चा केली त्यांना सुपूर्त केली तुमच्या कुटुंबाच्या संकल्पातून तयार झालेले ह्या मूर्तीचे पूजन आम्ही आमच्या घरी नित्यनियमाने करू असं बोलून त्यांनी ती मूर्ती स्वीकारली.

तसे पहाता बार्शी सारख्या छोट्या शहरातून सुरू झालेला हा उपक्रम हा बार्शी पुरता मर्यादित राहणार उपक्रम नाही याची संकल्पना खूप विस्तृत रूप धारण करणारी आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.

तुम्ही केलेल्या कार्याचे मोठ्या प्रमाणात चीज व्हायला पाहिजे अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली आणि हा उपक्रम पुढे चालून मोठं स्वरूप घेईल अशा पद्धतीचे भावनाही त्यांनी व्यक्त केली.

प्रत्यक्षात छत्रपतीं घराण्यातील वंशजांकडून माझ्या कलेचे कौतुक झाले हा माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान असेल असे आर्टिस्ट फपाळ यावेळी म्हणाले.

महाराजांची मूर्ती घराघरात जावी या उद्देशाने फपाळ यांनी ही मूर्ती बनवली आहे त्यामुळे कुठलीही अपेक्षा मनात न ठेवता त्यांनी हा उपक्रम हाती घेतला असला व तुम्ही तुमची जबाबदारी व्यवस्थित पार पाडली तरी पण आमची ही काही जबाबदारी आहेत त्या आम्ही निश्चित पार पाडू असे बोलून फपाळ यांना शुभेच्छा दिल्या यावेळी बार्शीतील लायन्स क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.