मराठी भाषेची लिपी असलेल्या देवनागरीचे सौंदर्य या भाषेइतकेच अनुपम आहे. त्यातही ही भाषा सुलेखनातून समोर येते तेव्हा मोठा आनंद देणारी बाब ठरते. व्यवसायाने स्थापत्यकार असलेल्या कळंबोली येथील शिरीष चव्हाण यांनी दहा वर्षांपासून सुलेखनाचा म्हणजेच कॅलिग्राफी चा जोपासलेला छंद सत्कारणी लावत भगवद्गीता सुलेखनात साकारली आहे.
स्वाध्याय परिवाराशी निगडित असल्याने शिरीष चव्हाण यांच्या कुटुंबामध्ये लहानपणापासूनच धार्मिक वातावरण होते. स्वाध्याय परिवारामुळे लहानपणापासून गीतेचे आकर्षण असल्याने त्यांनी सुलेखनाद्वारे भगवद्गीता लिहिण्याचा संकल्प केला. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जीवनाबद्दल उपदेश केलेला आहे. यामध्ये १८ अध्यायांत एकूण ७०० श्लोक आहेत. गीता जयंतीनिमित्त २०१ मध्ये शिरीष यांनी लिखाणाला सुरुवात केली. कोरोना काळातील वेळेचा सदुपयोग करत त्यांनी सलग चार चार तास लिखाण करून २६४ दिवसांमध्ये संपूर्ण भगवद्गीता लिहून काढली.
एका तासाला सरासरी दहा श्लोक लिहिले. ते नित्याने गीतापठण करतात. त्यांना संपूर्ण गीतेचा अर्थ पाठ आहे. गीता लिखाण करत असताना त्यांनी कुठल्याही प्रकारची चूक कटाक्षाने टाळली. गीता जयंतीनिमित्त लिखाणाला सुरुवात केलेली भगवद्गीता २६४ दिवसानंतर आषाढीला लिहून पूर्ण झाली . सुबक, सुंदर, सुवाच्च भगवद्गीता साकार झाली. त्यांनी एक प्रत काढली असून ती स्वाध्याय परिवारास भेट देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.
शिरीष चव्हाण यांच्या सारख्या लोकांमुळेच धर्म आणि सांस्कृति टिकून आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
More Stories
नागपूर प्रेस क्लब येथे पत्रकारांसाठी विशेष व्याख्यान; आपली पत्रकारिता ‘रिअलटाईम’ करण्यासाठी ‘एआय’ उपयुक्त – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह
वृक्ष संवर्धन समिती बार्शी च्या “वृक्ष संवर्धन दिनदर्शिका २०२५” चा प्रकाशन सोहळा संपन्न
विधानसभा तालिका सभाध्यक्षांची नियुक्ती जाहीर