आजपर्यंत आपण पाहत आलो की असे अनेक थोरपुरुष,शास्त्रज्ञ आहेत की ज्यांच्या जयंती किंवा पुण्यतिथीचे औचित्य साधून एखादा दिवस साजरा केला जातो, जेणेकरून समाजाला त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव व्हावी व समाजाने त्यांचे कौशल्य आत्मसात करावी, असाच भारतीय संस्कृती मध्ये साजरा करण्यात येणारा दिवस म्हणजे 28 फेब्रुवारी.
28 फेब्रुवारी हा दिवस पाहिला तर संभ्रम तयार होतो, कारण हा दिवस डॉ.सी.व्ही.रामन यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो, परंतु या दिवशी डॉ.सी.व्ही.रामन यांची जयंतीही नाही किंवा पुण्यतिथी देखील नाही, मग रमण यांच्या स्मरणार्थ हा दिवस का साजरा केला जातो ?
1987 साली भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे सचिव सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर वसंतराव गोवारीकर हे होते, या काळात त्यांनी अनेक योजना सुरू केल्या त्यावेळी त्यांच्या मनात असा विचार आला की, संपूर्ण भारतात विज्ञानवादी विचार निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात यावा. या दिवशी विज्ञान क्षेत्रातील सर्व लोकांनी विज्ञानाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवावे यासाठी त्यांनी असा विचार केला की भारतात विज्ञानाचा एकमेव नोबेल पुरस्कार हा डॉ.सी.व्ही.रामन यांना मिळाला आहे त्यामुळे विज्ञान दिन हा रमण यांच्या स्मरणार्थ असावा, परंतु हा दिवस त्यांचा जन्मदिन किंवा मृत्युदिन न ठेवता ज्या कारणासाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले तो दिवस विज्ञान दिन असावा.
म्हणून रमण यांचा शोधनिबंध ‘Nature’ या जागतिक मासिकाला ज्यादिवशी पाठवला म्हणजे ज्या दिवशी “रमण इफेक्ट” शोधून काढला व तो प्रसिद्ध झाला किंवा त्याची घोषणा करण्यात आली तो दिवस म्हणजे 28 फेब्रुवारी 1928 त्यामुळे त्यांना भौतिकशास्त्रात भारतातील पहिले नोबेल पारितोषिक मिळाले, हा दिवस 1987 पासून भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो, तसेच याची नोंद घेता 1954 रोजी डॉ.सी.व्ही.रमण यांना भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, त्याचबरोबर 1957 साली त्यांना लेनिन शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, डॉ.सी.व्ही.रमण यांना 1930 साली नोबेल पारितोषिक मिळाले या अगोदर 1901 मध्ये भौतिकशास्त्राचा जगातील पहिला नोबेल पुरस्कार हा जर्मन शास्त्रज्ञ विल्यम राॅन्टजेन यांना क्ष-किरणांचा शोध लावल्याबद्दल मिळाला तेव्हा पासून पुढे 29 वर्षांनी म्हणजे 1930 शाली डॉक्टर सी.व्ही. रामन यांना प्रकाशाचे विकिरण या कार्यासाठी भारतातील पहिला भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार प्राप्त झाला यानंतर 1983 सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना ताऱ्यांची रचना व उत्क्रांती या संशोधनासाठी भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. खरंतर सी.व्ही.रामन यांनी लावलेल्या रमण इफेक्ट या शोधामुळे भारताला विज्ञान क्षेत्रामध्ये एक नवी दिशा मिळाली.
रमण यांना 1924 साली लंडनच्या रॉयल सोसायटीचे सदस्यत्व मिळाले यावेळी लंडन वरून जहाजाने परतत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की समुद्राचे पाणी निळे दिसते आहे व त्यांच्या मनात प्रश्न आला की समुद्राचे पाणी हे निळे का असते यासाठी त्यांनी हे पाणी एका काचेच्या ग्लासमध्ये घेतले परंतु क्लासमध्ये घेतल्यानंतर ते पाणी रंगहीन दिसले यावरून त्यांनी संशोधन केलं कि प्रकाश वेगवेगळ्या माध्यमातून जात असतो तेव्हा त्याच्या तरंग लांबीत वाढ होते किंवा प्रकाशाची तरंगलांबी कमी होते याच सिद्धांताला प्रकाशाचे विकिरण असे संबोधले यासंदर्भात विविध संकल्पना त्यांनी स्पष्ट केल्या व हा शोध जगप्रसिद्ध झाला, या संदर्भात विविध संकल्पना जगासमोर मांडल्या गेल्या. यानंतर 1934 मध्ये बँगलोर या ठिकाणी स्थापन झालेल्या भारतीय विज्ञान संस्थेचे पहिले संचालक म्हणून डॉ.सी.व्ही.रामन यांची निवड करण्यात आली या माध्यमातून त्यांनी भारतामध्ये विविध संकल्पना स्पष्ट केल्या तसेच आपले अनमोल असे योगदान भारताच्या विज्ञानाच्या प्रगतीसाठी दिले.
28 फेब्रुवारी विज्ञान दिनानिमित्त अशा वैज्ञानिक शास्त्रज्ञास अभिवादन !!!!
विज्ञान शिक्षक
श्री. संग्राम दादासाहेब देशमुख
महाराष्ट्र विद्यालय बार्शी
Good
Good
Good
Good