तेर प्रतिनिधी :- उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील वक्फ जमीनीवरील करण्यात आलेल्या अतिक्रमणासह गैरव्यवहार प्रकरणीची सीबीआय मार्फत चौकशी करा अन्यथा उपोषण करण्याचा इशारा तेर येथील नासेर मकसुद काझी यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.
यावेळी या निवेदनात म्हटले आहे की उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील जामा मस्जिदची इनामी जमीनी अनधिकृतपणे विक्री होत असले बाबत व सदर जमीनीची चौकशी होणे याबाबत वेळोवेळी उस्मानाबाद जिल्हा वक्फ अधिकाऱ्यांना तक्रारी दिल्या तरीही आतापर्यंत कसलीही कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे तेर येथील वक्फ जमीनीवरील अतिक्रमणासह गैरव्यवहार प्रकरणी सीबीआय मार्फत चौकशी करा अन्यथा उपोषण करण्याचा इशारा तेर येथील नासेर मकसुद काझी यांनी जिल्हाधिकारी यांना दिनांक ९ मे रोजी निवेदनाद्वारे करण्यात आला आहे
More Stories
तृतीयपंथीयांच्या जागतिक परिषदेसाठी बार्शीचे सचिन वायकुळे यांना निमंत्रण
एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा निकाल तारीख
व्हॉईस ऑफ मीडिया बार्शीच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान