Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > बार्शी तालुक्यातील १९ गावांच्या पाणी पुरवठा योजनेसाठी १३ कोटी, ५१ लाख रूपये मंजूर – आमदार राजाभाऊ राऊत

बार्शी तालुक्यातील १९ गावांच्या पाणी पुरवठा योजनेसाठी १३ कोटी, ५१ लाख रूपये मंजूर – आमदार राजाभाऊ राऊत

बार्शी तालुक्यातील १९ गावांच्या पाणी पुरवठा योजनेसाठी १३ कोटी, ५१ लाख रूपये मंजूर - आमदार राजाभाऊ राऊत
मित्राला शेअर करा

केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून संयुक्तपणे राबविण्यात येणाऱ्या जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेसाठी अंतिम प्रशासकीय मान्यता मिळून १३ कोटी ५१ लाख १६ हजार ६३६ रुपये मंजूर झाल्याची माहिती आमदार राजाभाऊ राऊत यांनी दिली.

बार्शी तालुक्यातील काही गावांमध्ये पाणी पुरवठ्या संबंधी तुटवडा निर्माण होत होता. या पार्श्वभूमीवर आमदार राजाभाऊ राऊत यांनी, हा तुटवडा दूर करण्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पत्र व्यवहार करून, मंत्रालयत सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता.

सदरच्या योजनेत केंद्र सरकार ५० टक्के, राज्य सरकार ५० टक्के वाटा असणार आहे. त्याचप्रमाणे योजनेच्या मिशनसाठी लोकवर्गणी / लोकसहभागातून ग्रामपंचायतीचा देखभाल दुरुस्ती साठी १० टक्के वाटा असणार आहे. सदर योजनेतून प्रत्येक घरास नळजोडणीद्वारे पाणी पुरवठा करणे आवश्यक असून, दरडोई ५५ लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. सदर योजनेतील गांव हे नेहमीच हागणदारीमुक्त राहील याबाबत नेहमीच ग्रामपंचायतीने खात्री करणे आवश्यक आहे.

पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन निर्णयानुसार रूपये ५ कोटींपर्यंत दरडोई खर्चाच्या निकषात बसणाऱ्या स्वतंत्र व प्रादेशिक योजनांना प्रशासकीय मान्यतेचे अधिकार जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन यांना असल्याने, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन सोलापूर यांनी सदर योजनेसाठी मंजूरी दिलेली आहे. सदर योजनेची अंमलबजावणी ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांच्या मार्फत करण्यात येणार असल्याची माहिती आमदार राजाभाऊ राऊत यांनी दिली. सदर कामांची निवीदा लवकरच प्रसिद्ध होणार असून, सर्व प्रशासकीय बाबी पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे.

सदर योजना तालुक्यातील खालील गावांना मंजूर झालेली असून, त्यासाठी होणारा खर्च पुढीलप्रमाणे आहे.

१) पिंपळगाव धस या गावाकरीता ७२ लाख १० हजार ४८३ रूपये.

२) भानसळे या गावाकरीता ३१ लाख २८ हजार ७२३ रूपये.

३) गुळपोळी या गावाकरीता १ कोटी १४ लाख ३८ हजार ६१० रूपये.

४) यळंब या गावाकरीता ४७ लाख, ०१ हजार ८१२ रूपये.

५) सावरगाव करीता ३२ लाख ०५हजार ७३८ रूपये.

६) झाडी या गावासाठी ५५ लाख ६८ हजार ४०४ रूपये.

७) लक्ष्याचीवाडी या गावासाठी ४७ लाख ६३ हजार १६५ रुपये.

८) नारीवाडी या गावासाठी ७० लाख ०८ हजार ३३६ रूपये.

९) बोरगांव झाडी या गावासाठी ३७ लाख ८० हजार ९७६ रुपये.

१०) वाणेवाडी या गावासाठी ५४ लाख ३५ हजार ९३४ रूपये.

११) मांडेगाव या गावासाठी ९१ लाख ६१ हजार ०९८ रुपये.

१२) अरणगांव या गावासाठी ६३ लाख ३३ हजार ०७१ रूपये.

१३) आगळगांव या गावासाठी १ कोटी ४१ लाख ९१ हजार ०६५ रूपये.

१४) घोळवेवाडी या गावासाठी ६० लाख ३५ हजार ९९२ रुपये.

१५) बावी (आ) या गावासाठी १ कोटी ०६ लाख ०८ हजार ११४ रूपये.

१६) चिंचोली ढेंबेरेवाडी या गावासाठी ७६ लाख ५० हजार ७२३ रूपये.

१७) धामणगाव ( दु ) या गावासाठी १ कोटी ३३ लाख ६६ हजार २७२ रूपये.

१८) तांबे वाडी या गावासाठी ८४ लाख ३३ हजार ६२२ रूपये.

१९) काळेगांव या गावासाठी ३० लाख ९४ हजार ४९८ रूपये.