मुंबईत शनिवारी मान्सूनचे आगमन झाले. त्यावेळी, शनिवारी अणि रविवारी पावसाने हजेरी लावली. पाहिल्याचं पावसात आमदार निवास समोर असणारे गुलमोहोराचे भलेमोठे झाड उन्मळून पडले.
याच ठिकाणी गाडी पार्क केली असताना शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या गाडीवर झाड कोसळल्याची घटना घडली.
सुदैवाने झाड कोसळले तेव्हा गाडीत कोणीही नव्हते. त्यामुळे, कुणीही जखमी झालं नाही. मात्र गाडीचं मोठं नुकसान झालं आहे.
मुंबईतील आमदार निवासस्थानासमोर गाडी पार्क केलेली होती ही त्यावेळी ही दुर्घटना घडली. खासदार निंबाळकर राज्यसभा निवडणुकीसाठी मुबंईला गेले होते.
More Stories
कृषी पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार
नागपूर प्रेस क्लब येथे पत्रकारांसाठी विशेष व्याख्यान; आपली पत्रकारिता ‘रिअलटाईम’ करण्यासाठी ‘एआय’ उपयुक्त – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह
वृक्ष संवर्धन समिती बार्शी च्या “वृक्ष संवर्धन दिनदर्शिका २०२५” चा प्रकाशन सोहळा संपन्न