बार्शी – अंमली पदार्थ नियंत्रण विभाग (एनसीबी) कडून ‘२६ जून आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांचा गैरवापर आणि अवैध तस्करी विरोधी दिन’ च्या निमित्ताने जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून अंमली पदार्थांच्या दुरुपयोगाविरुद्ध ई-प्रतिज्ञा घेणेबाबत विविध कार्यालये व महाविद्यालयांना आवाहन करण्यात आले आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबई झोनल अधीक्षक दिनेश अंकुश चव्हाण यांनी सदरचे पत्र जिल्हाधिकारी, सोलापूूूर, पोलीस अधीक्षक, सोलापूर, पोलीस निरीक्षक, बार्शी यांचेसह बार्शीतील सर्व महाविद्यालयांना पाठविले आहे.
संबंधीत सर्व कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, महाविद्यालयातील विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांना ‘२६ जून आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांचा गैरवापर आणि अवैध तस्करी विरोधी दिन’ निमित्त ही ई-प्रतिज्ञा घेण्यासाठी प्रवृत्त करण्याबाबत या पत्रान्वये आवाहन कळविण्यात आले आहे. या प्रसंगी ‘से येस टू लाईफ, नो टू ड्रग्स’ या शीर्षकाची ई-प्रतिज्ञा अपलोड करण्यात आली आहे. या प्रतिज्ञेचा उद्देश अंमली पदार्थांच्या दुष्परिणामाचा संदेश पसरवणे व नागरिकांना याच्या वापरापासून परावृत्त करणे हा आहे. हा लढा भारतातील प्रत्येक घरापर्यंत नेला तरच अंमली पदार्थं विरुद्धचा लढा यशस्वी होईल.
अंमली पदार्थ नियंत्रण विभाग (एनसीबी) ही एक भारतीय केंद्रीय कायदा अंमलबजावणी आणि गुप्तचर संस्था आहे. नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक पदार्थ कायद्याच्या तरतुदींनुसार अंमली पदार्थांची तस्करी आणि बेकायदेशीर पदार्थांच्या वापराशी लढा देण्याचे काम एजन्सीकडे आहे.
More Stories
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख दर्शन
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वाहने उभा करून माननीय उपमुख्यमंत्री महोदय श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे चालत निघाले
जिल्ह्यातील रुग्णालयांचा आयुष्मान भारत व महात्मा फुले योजनेत समावेशासाठी पुढाकार