सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे मालगाडीचा अपघात, रेल्वे रुळ सोडून इंजिन थेट शेतात घुसलं, विचित्र अपघाताचा व्हिडीओ पाहा.
मालगाडी रुळावरुन घसरुन थेट शेतात सोलापूरहून पुण्याच्या दिशेने जाणारी मालगाडी करमाळा तालुक्यातील केम जवळ रुळावरून घसरली.
रात्री 3 वाजून 40 मिनिटांनी ही घटना घडल्याची माहिती रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली. सिमेंट घेऊन जाणाऱ्या या मालवाहतूक गाडीचे समोरील दोन इंजिन आणि दोन डबे रुळावरून खाली घसरले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
More Stories
भैरवनाथ विद्यालयातील श्री.संतोषकुमार चिकणे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते तृत्तीयपंथी देवांशी काकडेच्या आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन
बार्शीच्या भगवंत अभियांत्रिकी मध्ये बीसीए प्रवेश परीक्षा कार्यशाळा संपन्न