आमदार राजाभाऊ राऊत यांनी ३१ ऑगस्ट रोजी बार्शी शहर व तालुक्यातील अंध, अपंग, दिव्यांग बंधू-भगिनीं सोबत त्यांच्या समस्या, अडी-अडचणी, प्रश्न जाणून घेण्यासाठी बैठक घेतली होती. या बैठकीत अनेक प्रश्नांवर, समस्यांवर चर्चा करण्यात आली होती.
या बैठकीत त्यांनी त्यांच्या समस्या, अडी-अडचणी सोडविण्यासाठी व भविष्यातील नियोजन व्यवस्थितपणे करण्यासाठी मा. तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच व इतर संबंधित अधिका-यांसोबत बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे माहीती व विश्वास आमदार राजाभाऊ राऊत यांनी दिला होता.
या पार्श्वभूमीवर आमदार राजाभाऊ राऊत यांनी मा. तहसीलदार सुनील शेरखाने साहेब यांना पत्राद्वारे संबंधितांची गुरुवार दिनांक ८ सप्टेंबर २०२२ रोजी, दुपारी १२ वाजता, यशवंतराव चव्हाण सभागृह येथे बैठक आयोजित करण्यास सांगितले आहे. या बैठकीस बार्शी शहर व तालुक्यातील सर्व अंध, अपंग, दिव्यांग बंधू भगिनींनी उपस्थित रहावे अशी विनंती आमदार राजाभाऊ राऊत यांनी केली आहे.
More Stories
राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी पालकमंत्री जाहीर
तृतीयपंथीयांच्या जागतिक परिषदेसाठी बार्शीचे सचिन वायकुळे यांना निमंत्रण
उळे येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली