बार्शी – छोट्या उद्योजकांसाठी आणि पत नसलेल्या नव उद्योजकांसाठी तसेच उद्योग व्यवसाय करायची इच्छा असून भांडवला अभावी आपली स्वप्ने पूर्ण करू शकत नाहीत अशा होतकरूंसाठी लोकशक्ति नागरी सहकारी पतसंस्थेची उभारणी झाली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विधीज्ञ बी. एन. चव्हाण यांनी केले.

शिवशक्ति बँकेचे संचालक हनुमंत चव्हाण यांच्या प्रयत्नाने लहान बचत गटाचे रूपांतर पतसंस्थेत झाले आहे. या उद्घाटनप्रसंगी प्रा. डॉ. दिलीप मोहिते, चेअरमन आबासाहेब पाटील, संचालक वासुदेव मुळे, वैभव बुटे, प्राचार्य दीपक गुंड, सदाशिव सोनके, युवा ग्रुपचे अध्यक्ष सुशांत चव्हाण, उदय बारंगुळे, प्रमोद जाधव, योगेश उपळकर उपस्थित होते.
यावेळी प्रा. दिलीप मोहिते यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमास आर. एन. मोरे, अरुण कदम, भीमा मस्के, सदानंद गरड, यांच्यासह मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
More Stories
बार्शीपुत्र सुजित मुंढेंच्या ‘पोलीस प्रशासन व नागरिक सेवा’ पुस्तकाचे शिवाजी विद्यापीठात प्रकाशन
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते तृत्तीयपंथी देवांशी काकडेच्या आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन
कलाशिक्षक संघटनेतर्फे शिक्षण मंत्र्यांना मागण्यांचे निवेदन सादर