बापूसाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती ग्रुपच्या वतीने ग्रामीण रुग्णालयात बसवण्यात आलेल्या शुद्ध पाण्याचा आरओ प्लॅन्ट व फ्रिज चे लोकार्पण
बार्शी शहर आणि तालुक्यामध्ये सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे, छत्रपती ग्रुप चे प्रमुख मार्गदर्शक बापूसाहेब पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, छत्रपती ग्रुपच्या वतीने ग्रामीण रुग्णालय बार्शी येथे देण्यात आलेल्या, रुग्णांच्या सेवेसाठी व अत्यावश्यक असणारे अंदाजे 68 हजार रुपये किंमतीचे शुद्ध व थंड पिण्याच्या पाण्याचा 80 लिटर क्षमतेचा आरओ प्लॅन्ट व फ्रिज ( शीतपेटी ) चा लोकार्पण सोहळा करण्यात आला.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, स्मार्ट ॲकॅडमी चे संचालक सचिन वायकुळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कदम, वैद्यकीय अधिकारी डॉ. शितल बोपलकर, हृदयरोग तज्ञ डॉ. आदित्य साखरे, डॉ. अक्षय गव्हाणे, पत्रकार संजय बारबोले, पत्रकार धैर्यशील पाटील, जय शिवराय प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय राऊत, किरण कोकाटे, संपतराव देशमुख, डिजिटल मीडियाचे अध्यक्ष दिनेश मेटकरी, उपाध्यक्ष अमीन गोरे, सचिव धिरज शेळके, खजिनदार विक्रांत पवार, छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष अजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
गेली 13 वर्षापासून छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक बांधिकली जपत, विविध क्षेत्रात सातत्याने समाजोपयोगी कार्य केले जात आहे. कोरोना च्या काळात छत्रपती ग्रुप च्या वतीने, ग्रामीण रुग्णालयासाठी 51 ऑक्सिजनच्या टाक्या, 35 पीपीई किट, 10 हजार मास्क आणि सॅनिटायझर बॉटल तसेच 1000 किलो धान्य देण्यात आले होते. याचाच एक भाग म्हणून ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या पिण्याच्या शुद्ध पाण्याचे कायमस्वरूपीचे व्यवस्थापन व्हावे या हेतूने ग्रामीण रुग्णालय बार्शी येथे आरओ प्लॅन्ट व फ्रिज ( शीतपेटी ) भेट म्हणून देण्यात आले. ग्रामीण भागातील गोरगरीब व गरजू रुग्णांसाठी छत्रपती ग्रुप वरदान ठरतोय अशा प्रकारची प्रतिक्रिया जनसामान्यांमध्ये उमटत आहे. बापूसाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त, सदरील साहित्याचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती ग्रुपच्या उपक्रमाचे कौतुक करत, पुढील सामाजिक कार्यास व बापूसाहेब पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या तर वैद्यकीय अधिकारी डॉ. शितल बोपलकर यांनी छत्रपती ग्रुपचे आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी छत्रपती ग्रुप चे पदाधिकारी व सदस्य बापूसाहेब पवार, अमर लोमटे, रवी झोंबाडे, सारंग चौगुले, प्रवीण शिंदे, विनोद काकडे, मनोज चिंचकर, सुरज व्हळे आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धिरज शेळके यांनी केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय पाटील यांनी केले तर उपस्थितांचे आभार विजय राऊत यांनी मानले.
More Stories
उळे येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली
एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा निकाल तारीख
व्हॉईस ऑफ मीडिया बार्शीच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान