सोलापूर: येथे पार्क स्टेडियम मध्ये पुणे विभागीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, या स्पर्धेत पुणे विभागातून विविध संघ सहभागी झाले होते.
बार्शीच्या इतिहासात पहिल्यांदा बार्शीतील K.L.E सोसायटी, कर्नाटक संचालित सिल्व्हर ज्युबिली हायस्कूल च्या टेबल टेनिस संघाने पुणे शहराला पराभूत करून विजय नोंदवला आणि राज्य स्तरीय स्पर्धेसाठी आपला मार्ग मोकळा केला.

या 14 वर्षा खालील संघात
1.कॅप्टन ओंकार मूळे
2.वेदांत खळदे
3.अथर्व खळदकर
4.सोहम उंबरदंड
5.विश्वेष ढोले
यांचा सहभाग होता, तसेच 17 वर्षाखालील मुलामधील निवड चाचणीत सुयोग खळदकर वैयक्तिक तृतीय क्रमांक मिळवत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
या सर्व खेळाडूना गणेश स्वामी यांनी बार्शी टेबल टेनिस अकॅडमी ठिकाणी प्रशिक्षण देत आहेत.
तसेच सिल्व्हर ज्युबिली हायस्कूल चे मुख्याध्यापक प्रशांत कोल्हे, उपमुख्याध्यापक अनिरुद्ध चाटी, पर्यवेक्षिका अनुराधा शिलवंत, क्रिडा विभाग प्रमुख हेमंत गाढवे, मार्गदर्शक ऐनापुरे, पुणेकर सर,संतोष खेंडे आदींनी सर्व खेळाडूंच कौतुक करत शाबासकी ची थाप दिली.
तसेच 17 वर्षाखालील मुलांमधे सिल्व्हर ज्युबिली प्रशालेस व 19 वर्षखालील एम. आय. टी. यांना मात्र द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले.
More Stories
कलाशिक्षक संघटनेतर्फे शिक्षण मंत्र्यांना मागण्यांचे निवेदन सादर
जिजाऊ गुरुकुल खांडवीला राज्यस्तरीय The Best School Award
मातृभूमी प्रतिष्ठानच्या इनडोअर स्टेडियमचे भूमिपूजन मोठ्या हर्ष उल्हासात संपन्न