बार्शी येथील ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी ही संस्था गेली महीनाभर या कार्यक्रमासाठी अहोराञ पण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी झटत होती. दि ५ आक्टोंबर या दिवशी जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अध्यक्ष मा.श्री शिरीष सरदेशपांडे साहेब (पोलीस अधिक्षक सोलापुर) प्रमुख पाहुणे मा.श्री एफ आर शेख साहेब (तहसीलदार)बार्शी, मा.श्री बाळासाहेब चव्हाण साहेब (मुख्याधिकारी) न.पा. बार्शी मा.श्री अनिलजी बनसोडे साहेब ( प्रशासनधिकारी ) न.पा शिक्षण मंडळ बार्शी, मा. श्री संजय पाटील साहेब ( पर्यवेक्षक) न. पा शिक्षण मंडळ बार्शी. मा.श्री अजितदादा कुंकुलोळ( राज्यसंघटक ) व्हाईस ऑफ मिडीया.मा.श्री संजय पाटील साहेब
( पर्यवेक्षक ) न. पा. शिक्षण मंडळ बार्शी, मा. श्री अमृतनाना राऊत माउली लाॅन्स बार्शी, शंशांक गुगळे ( उद्योजक ) चांदमल ज्वेलर्स बार्शी, मा.श्री सचिन वायकुळे सर ( स्मार्ट अकॅडमी संस्थापक) बार्शी, तसेच सतीश अंधारे ( साई डेव्हलपर्स बार्शी ) इ. मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थीत होते.
या जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार स्वरुप ट्राफी, फेटा, प्रमाणपञ, शाल, गुलाब पुष्प आणी पुस्तक असे होते ओन्ली समाज सेवा संस्थेने या वर्षी जिल्हास्तरीय २० आदर्श शिक्षक निवड केली होती. तसेच संस्थेने काही विशेष पुरस्कार पण दिले आहे ते पुढील प्रमाणे विशेष पुरस्कार १) मा. सौ. प्रा माधुरी हेमंत शिदे २) मा. श्रीम अनिता शिवाजी ३) मा. सौ. महादेवी रेवनसिध्द स्वामी ४)मा. श्री रमेश संतराम गवळी ६) मा. श्री. प्रा. डाॅ. मधुकर जगन्नाथ लेंगरे यांना पुरस्कार देवुन सन्मानित केले. तसेच ओन्ली समाज सेवा संस्थेने दोन विशेष सत्कार केले. मा. श्री अजितदादा कुंकुलोळ ( राज्यसंघटक) व्हाईस ऑफ मिडिया पदी निवड झाली म्हनुन सत्कार केला. आणी दुसरा गणेश नारायण कदम यांचा विविध सामाजिक संस्थेत कार्य करतात तसेच नगरपालिका शिक्षण मंडळ बार्शी यांचा आदर्श पुरस्कार मिळाला बद्दल संस्थेच्या वतीने मा.श्री शिरीष सरदेशपांडे साहेब पोलिस अधिक्षक सोलापुर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यानंतर मान्यवर पाहुण्यानी मनोगते व्यक्त करत शिक्षकांचे तसेच संस्थेचे अभिनंदन केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी अध्यक्ष राहुल वाणी, संतोष शेळगावकर, विजयजी दिवाणजी, नागनाथ सोनवणे, मानकोजी ताकभाते, अजय तिवारी, गणेश कदम सर, सुनिल फल्ले सर, दिपक बगाडे, वैभव उकीरडे, बिभीषण अवताडे, सूनिल नवले, प्रतिक खंडागळे, दिपक ढोणे, अतुल वाणी, प्रविण काळेगोरे, सुमितभैय्या खुरंगळे, सागर घंटे, चैतन्य दिवानजी, प्रसाद पवार, राहुल नागटिळक, गणेश सातारकर, ओकांर विधाते, बाळु लोखंडे, अनिल खुडे, सुरेंद्र जंगम, भरत जाधव, अमोल रावळ यांचे परीश्रम लाभले तसेच या कार्यक्रमासाठी महीला सदस्य देखील पूढे होत्या यामध्ये कोमल वाणी, सायरा मुल्ला, माधुरी वाणी, रेखा सुरवसे ( विधाते) सारिका जाधवर, रागीनी झेंडे, अपर्णा शिराळ, संगिता पवार, कोमल काळेगोरे, कोमल कोठावळे, पुजा नवले, रेखा वराडे, लक्ष्मी मोहीते, नंदा कुलकर्णी, रेखा सरवदे, सुजाता अंधारे, सुनिता गायकवाड, सारीका पुकाळे, ञिशाला मिसाळ, मंदा बोकेफोडे, आगलावे ताई मोनिका सोनवणे, शुभदा जंगम इ. महीला सदस्य आणी पदाधिकारी उपस्थित होते असे संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी यांनी सांगीतले.
More Stories
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सूचना: केवायसी प्रक्रिया तातडीने करा!
बार्शी येथे मनशक्ती प्रयोग केंद्राची आरोग्यप्राप्ती, रोगमुक्ती कार्यशाळा संपन्न