Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > मराठा आरक्षण योद्धा श्री. मनोज जारंगे- पाटील यांचा उद्या बार्शी येथील दौरा

मराठा आरक्षण योद्धा श्री. मनोज जारंगे- पाटील यांचा उद्या बार्शी येथील दौरा

मराठा आरक्षण योद्धा श्री. मनोज जारंगे- पाटील यांचा उद्या बार्शी येथील दौरा
मित्राला शेअर करा

मराठा आरक्षण योद्धा श्री मनोज जरांगे पाटील हे बार्शी येथे दिनांक 6 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा, शिवाजी महाविद्यालय समोर बार्शी उपस्थित राहणार आहेत व या ठिकाणी श्री मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा होणार आहे.

मराठा समाजासाठी ओबीसी मधूनच आरक्षण मिळावे यासाठी त्यांनी केलेल्या उपोषणाला प्रतिसाद म्हणून महाराष्ट्र शासनाने तीस दिवसाची मुदत दिलेली आहे. मराठा समाजातील कुणबी वर्गाला ओबीसी मध्ये आरक्षण आहे. परंतु कुणबी आणि मराठा हा एकच प्रवर्ग असून सरसकट सर्व मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यावे ही मराठा समाज बांधव आग्रही आहेत. मनोज जरांगे पाटील यांची भूमिका समजून घेण्यासाठी व त्यांना पाठिंबा देण्यासाठी तमाम बार्शी शहर व तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

होणाऱ्या गर्दीचा विचार करता उद्या बार्शी शहरांमध्ये शुक्रवार दिनांक सहा रोजी विविध ठिकाणांहून येणाऱ्या सर्वच मराठा बांधवांसाठी विविध ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आलेली आहे. या ठिकाणी तुळजापूर रोड वरून येणारे सर्व वाहने कासरवाडी रोड या ठिकाणी पार्किंग करावीत.

तसेच खांडवी शेंद्री या भागाकडे येणारी वाहनांनी कुईवाडी रोड शिवशक्ती मैदान च्या बाजूला असलेल्या रोडवर पार्किंग करावे. आगळगाव काटेगाव या भागातून येणाऱ्या वाहनांनी मंगळवार पेठ या ठिकाणी वाहनांची सोय करावी. सभेच्या ठिकाणी शाळा महाविद्यालय आणि दवाखाना असल्यामुळे येणाऱ्या सर्व समाज बांधवांनी वाहतुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन सकलमराठा समाजाच्या वतीने करण्यात आलेले आहे.