संत जनाईनगरी अर्थात गंगाखेडची अष्टपैलू खेळाडू चिन्मयी बोरफळे हिची ८ ऑक्टोबर पासून सुरत (गुजरात) येथे होत असलेल्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा (अंडर-१९) साठी महाराष्ट्र महिला क्रिकेट संघाच्या उपकर्णधार पदी निवड झाली आहे.
अनुकूल परिस्थिती नसताना केवळ मेहनत आणि जिद्दीच्या बळावर तिने इथंपर्यंत मजल मारली आहे. गेल्या पाच वर्षांपासून ती क्रिकेट खेळात चुणूकदार कामगिरी करीत आहे. क्रिकेट हि केवळ पुरूषी मक्तेदारी नसून महिलांही त्या क्षेत्रात नावलौकिक करू शकतात, हा आदर्श चिन्मयी हिच्या निवडीने घालून दिला आहे. तिच्या यशाबद्दल तिचे मन:पूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा!
More Stories
सेंट जोसेफ स्कूल बार्शीच्या ध्रुव पाटील याची राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड
श्री. शिवाजी महाविद्यालयाचे मैदानी स्पर्धेत घवघवीत यश
बॅडमिंटन स्पर्धेत बी.पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज बार्शीचा संघ प्रथम