दोन अमेरिकन व्यक्ती भारतीय शेतकऱ्यांसाठी काम आहेत. भारतीय शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुणे शहरात त्यांनी एक स्टार्टअप उभारले आहे. त्या स्टार्टअपच्या माध्यमातून मायक्रो सोलर पंप विकसित केला आहे.
आजही भारतीय अर्थव्यवस्थेचा डोलारा कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. देशातील कोट्यवधी लोकांसाठी शेती हा उपजिवेकेचे साधन आहे. अजून देश कृषीप्रधान म्हटला जातो. यामुळे सरकारबरोबर काही सामजिक संस्थांकडून शेतकऱ्यांसाठी सातत्याने काम केले जात आहेत. शेतकऱ्यांना उपयोगी पडणारे संशोधन केले जात आहे. परंतु आजवर विहिरीतून पाणी उपासा करणाऱ्या पंपावर फारसे संशोधन झाले नाही. त्यामुळे पारंपरिक पद्धतीचे विजेवर चालणारे पंप वापरणे हाच पर्याय शेतकर्यांसमोर होता त्यात विजेची अनियमितता ही मोठी समस्या आहे. अलीकडे सोलर पंप आले असले तरी त्याची किंमत पाहता सामान्य शेतकऱ्यांना परवडणारी नाही तसेच त्याच्या बॅटरी चोरीचे प्रमाण जास्त आहे. परंतु या मायक्रो सोलर पंपामुळे शेतकऱ्यांची ही समस्या कमी झाल्यास हे संशोधन भारतीय शेती क्षेत्रातील मोठे संशोधन ठरणार आहे.
गेल्या सात वर्षांपासून पुणे शहरात राहत असणाऱ्या दोन अमेरिकन व्यक्तींनी शेतकऱ्यांसाठी मायक्रो सोलर पंप तयार केला आहे. हा मायक्रो पंपमुळे शेतकऱ्यांच्या विजेच्या बिलात मोठी बचत होते आहे तर दुसरीकडे रोज घेऊन जाणे सोपे असल्यामुळे चोरच्या समस्येपासून सुटका झाली आहे.
स्टार्टअप पासून सुरवात
मुळचे अमेरिकन असलेले कॅटी टेलर आणि व्हिक्टर लेस्नीवस्की यांनी खेतवर्क (Khethworks) नावाने स्टार्टअप सुरु केले. MIT मध्ये शिक्षण घेत असताना मास्टर पदवीच्या माध्यमातून ते टाटा ट्रस्टसोबत काम करु लागले. मग भारतीय शेतकऱ्यांसाठी त्यांनी स्टार्टअप सुरु केले. शेतकऱ्यांसाठी काम करण्यापूर्वी ते ओडिशा आणि झारखंडमधील शेतांमध्ये गेले. अनेक महिने त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद केला.
गरज ओळखून साकारला मायक्रो सोलर पंप
शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर व्हिक्टर यांना अडचणी समजल्या. शेतीला पाणी पुरवठासाठी विजेची समस्या दिसली. तसेच सोलार पंपची शेतातून चोरी होण्याच्या घटना दिसल्या. मग त्यांनी यावर विचार सुरु केला. नवीन प्रकल्पावर काम सुरु केले. त्यासाठी फंडीग जमा केला. भारत सरकारकडून मायक्रो सोलर पंपचा आरखडा मंजूर करणे, पेटेंट घेणे, पुणे शहरात युनिट उभे करण्याचे काम त्यांनी केले. त्यानंतर मायक्रो सोलार पंप सुरु झाला.
९०० पंपची निर्मिती
खेतवर्क्सने आतापर्यंत ९०० पंपचे वाटप शेतकऱ्यांना केले असून. हा पंप मायक्रो असल्याने रोज शेतात घेऊन जाणे सोपे आहे. त्यामुळे सोलार पंपची बॅटरी चोरीची समस्या सुटली. हा पंप वजनाने हलका असल्याने महिलाही सहज घेऊन जाऊ शकतात. या पंपमुळे शेतकऱ्यांचे वर्षाचे दहा, बारा हजार रुपये विज बील वाचत आहे. विदेशातील लोकांनी भारतीय शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या या स्टार्टअपचे कौतूक होत आहे.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद