सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्वाचे असलेले वैराग पोलिस स्टेशनच्या नव्या इमारतीच्या बांधकामांसाठी ३ कोटी ५० लाख मंजूर कामाचे भूमिपूजन आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व मा. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे संपूर्ण राज्यातील पोलीस बांधवांच्या घर बांधण्यासाठी सकारात्मकपणे निर्णय घेत असून, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ते आग्रहाची भूमिका घेत आहेत, आपल्या पोलीस बांधवां बद्दल मला अभिमान असून, लोकप्रतिनिधी या नात्याने मला पोलीस बांधवांची सेवा करण्याची संधी मिळत आहे असे आमदार राजाभाऊ राऊत यांनी सांगितले.
यावेळी ग्रामीण पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, डि.वाय.एस.पी.जालींदर नालकुल साहेब, पोलीस निरीक्षक विनय बहीर, वैरागचे संतोष (दादा) निंबाळकर तसेच इतर प्रमुख अधिकारी व पोलीस खात्यातील कर्मचारी उपस्थित होते.
More Stories
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सूचना: केवायसी प्रक्रिया तातडीने करा!
बार्शी येथे मनशक्ती प्रयोग केंद्राची आरोग्यप्राप्ती, रोगमुक्ती कार्यशाळा संपन्न