Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > बार्शी उपसा सिंचन योजनेची उर्वरित कामे लवकरच पूर्ण होणार – आमदार राजेंद्र राऊत

बार्शी उपसा सिंचन योजनेची उर्वरित कामे लवकरच पूर्ण होणार – आमदार राजेंद्र राऊत

बार्शी उपसा सिंचन योजनेची उर्वरित कामे लवकरच पूर्ण होणार - आमदार राजेंद्र राऊत
मित्राला शेअर करा

हिंदवी समाचार : बार्शी, आमदार राजेंद्र राऊत यांनी कार्यकारी संचालक कृष्णा खोरे विकास महामंडळ कार्यालय पुणे यांचे कार्यालयात बार्शी उपसा सिंचन योजनेचे पाणी तावडी तलावात सोडून बार्शी तालुक्यातील धोत्रे ते यावली या भागा मधील २१ गावांना देण्यासाठी, नवीन उपसा सिंचन योजनेच्या मंजुरीबाबत व बार्शी उपसा सिंचन योजनेच्या कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली.

बार्शी उपसा सिंचन योजनेची उरलेली सर्व कामे तातडीने हाती घेऊन येत्या दोन वर्षात योजना पूर्ण करण्याबाबत कार्यवाही करण्याच्या संबंधितांना सूचना दिल्या. तसेच रखडलेली उर्वरित कामे लवकरच पूर्ण होतील असेही आमदार राजेंद्र राऊत यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीस कार्यकारी संचालक कपोले, मुख्य अभियंता एच. टी. धुमाळ, अधीक्षक अभियंता बागडे, कार्यकारी अभियंता कोंडेकर, उप अभियंता एस.के होनखांबे उपस्थित होते.