Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > महाराष्ट्र > आता हव्या प्रेमाच्या लाटा….

आता हव्या प्रेमाच्या लाटा….

मित्राला शेअर करा

दोन वर्षांपासून समस्त विश्वातील जनमानसावर ज्याच्या विपरीत परीणाम झाला,ज्याने पुर्ण जगात हाहाकार माजवला, असंख्य माणसं ज्याच्यामुळे दगावली, असंख्य कुटुंब उद्ध्वस्त झाली,बेरोजगारी वाढली,उद्योगधंदे बुडाले,अर्थव्यवस्था खालावली,ज्याने अख्ख जग ठप्प केले,तो महाराक्षस आजार म्हणजे”कोरोना”

ह्या राक्षसाने होत्याचे नव्हते केले.जे कानाने ऐकून, डोळ्यांनी पाहून हृदयाला धक्का पोहचेल अशा अनेक घटना या राक्षसाने निर्माण केल्या.हा सागरासारखा विशाल होता,पण नजरेस पडत नव्हता .सागरात जशी लाट येते तशी याचीही लाट आली.पहिली,दुसरी,तिसरी ई.पहिल्या लाटेने जबरदस्त दहशत, भिती निर्माण केली. ह्या भितीने असंख्य माणसं मेली.दुसरी लाट तर पहील्या लाटे पेक्षा भयानक होती.ह्या लाटेने तर कहरच केला. खूप माणसं जग सोडून गेली,भाऊ-भावाला,आईवडील -मुलांना,मुले आईवडीलांना ,नातेवाईक जवळच्यांना ईच्छा असून स्पर्श करू शकत नव्हते.काही जण तर आपल्या जवळच्या नातेवाईकांचे तोंड पण पाहू शकत नव्हते. ह्या राक्षसाने स्वकियांमधे दरी निर्माण केली.नातेवाईकांमधे दरी निर्माण केली.शेजा-यामधे दरी निर्माण केली.एकमेकांपासून असंख्य लोकांना दुर केले.उत्कट भाव असून देखील जवळच्या व्यक्ती आपल्या जवळच्या व्याक्तिला स्पर्श करू शकत नव्हता.काही प्रेते तर दवाखान्यातून परस्पर स्मशानभूमीत गेले.घरच्या माणसांना प्रेताचे अंतिम दर्शन पण घेता आले नाही.एकमेकांमध्ये असलेले ऋणानुबंध ह्या राक्षसाने संपवून टाकले.एकमेकांतले प्रेम कमी झाले आहे.आता महामारीच्या लाटा ओसरतांना दिसत आहेत. आता आपल्या एकमेकांतले प्रेम पुन्हा हृद्धीगंत करायचे आहे.

थोडा उजेड ठेवा
अंधार फार झाला

भावाभावांतले प्रेम, आईमुलांतले प्रेम, पती पत्नीचे प्रेम, आप्तेष्टांचे प्रेम, नातेवाईकांचे प्रेम शेजा-याचे प्रेम, समाजाचे प्रेम निर्माण करायचे आहे.त्यासाठी आपण आपल्या नातेवाईकांना आपल्या घरी बोलवा,त्याच्यांशी संवाद साधा, चहापाणी करा,शेजा-यांना बोलवा त्यांच्याशी प्रेमाचे दोन शब्द बोला,आपण त्यांच्या घरी जाऊन,संवाद साधा.कोरोनाने वाढवलेली दरी कमी करा.प्रेम वाढवा,एकमेकांची विचारपूस करा.एकमेकांना आधार द्या,सहकार्य करा.कोरोनाच्या लाटा आता ओसरतांना दिसत आहेत पण प्रेमाच्या लाटा मोठ्या प्रमाणावर येवू द्या.जिकडे तिकडे प्रेम नजरेस पडू द्या

माना कि अंधेरा घना है।
लेकिन दिया जलाना कहा मना है।

आपणांस ठाऊक आहे संकट खूप मोठे आहे.पण आता आपण एकमेकांबद्दल प्रेम वृद्धिंगत करून या संकटाला हरवू या म्हणून आपणांस

आता हव्या आहेत प्रेमाच्या लाटा

    शब्दांकन:श्री.यशवंत निकवाडे