Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > आ. राजेंद्र राऊत यांच्या हस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून बार्शी तालुक्यात ९ कोटी २४ लाख रुपयांच्या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन

आ. राजेंद्र राऊत यांच्या हस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून बार्शी तालुक्यात ९ कोटी २४ लाख रुपयांच्या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन

मित्राला शेअर करा

ग्रामीण भागातील रस्त्यांचा विकास करून ती चांगल्या प्रकारे नागरिकांकरीता दळणवळणासाठी उपलब्ध व्हावीत यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून बार्शी तालुक्यातील जवळपास ११ किलोमीटर लांबीच्या ४ रस्त्यांकरिता ९ कोटी, २४ लाख, १९ हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, त्या कामांचे भूमिपूजन संपन्न झाल्याची माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली.

बार्शी तालुक्यातील चार रस्ते पुढीलप्रमाणे १) कारी ते नारीवाडी या ४.९५ किमी. लांबीच्या रस्त्याकरीता ४ कोटी २० लाख, १३ हजार रुपये, २) घारी ते पाथरी या २.४५० किमी. लांबीच्या रस्त्याकरीता १ कोटी ९१ लाख, ५१ हजार रुपये, ३) सर्जापूर ते वैराग हत्तीज (इ.जि.मा.२७) या १.२५ किमी.लांबीच्या रस्त्याकरीता ९३ लाख, ०४ हजार रुपये, ४) बोरगाव ते प्र.जी.मा. १८ या १.९०० किमी. लांबीच्या रस्त्याकरीता २ कोटी, १९ लाख, ५१ हजार रूपये, असे एकूण ९ कोटी, २४ लाख, १९ हजार रूपयांचा निधी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून उपलब्ध झाल्याची माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली.

येणाऱ्या पुढील काळातही बार्शी शहर व तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना प्राथमिक गरजा, सोयी-सुविधा देण्यासाठी व विकास कामे करण्यासाठी मी कटिबद्ध असून त्यासाठी सतत प्रयत्नशील असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. कोरोना महामारीमुळे विकास कामांचा निधी उपलब्ध करण्यात अडचणी येत असून, जास्तीत जास्त प्रमाणात यांसाठी निधी उपलब्ध करण्यासाठी मी प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रस्त्यांच्या विकासाकरिता तालुक्यातून जाणारे राज्य मार्ग व राष्ट्रीय महामार्ग यांकरिता यापूर्वी जवळपास १०० कोटींपेक्षा जास्त निधी मंजूर झाला असून, ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्याचबरोबर तालुक्यातील अनेक रस्त्यांच्या मंजूरीचे व निधी मिळण्यासाठीचे प्रस्ताव शासन स्तरावर असून त्यांचा पाठपुरावा सुरू आहे, असेही राजेंद्र राऊत यांनी सांगितले.

यावेळी पंचायत समितीचे सभापती अनिल काका डिसले, आप्पासाहेब कोरके, शिवाजी दादा गायकवाड, डॉ.कपिल कोरके, नगरसेवक विलास आप्पा रेनके, प्रभाकर डमरे, प्रशांत जगदाळे, गणेश जगदाळे, डॉ.देवेंद्र डोके, अमोल कोरके व ग्रामस्थ उपस्थित होते.