यावेळी सुयश विद्यालयाच्या इयत्ता ५ वी चे ४० व इयत्ता ८ वी चे १६ शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, तसेच इतर शाळेतील मिळून बार्शी शहरातील १४६ व तालुक्यातील ९८ अशा एकूण २४४ शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सत्कार व गुणगौरव, तसेच शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी झालेल्या शाळेतील मुख्याध्यापकांचा सन्मान आमदार राजाभाऊ राऊत यांच्या हस्ते संपन्न झाला.

सोलापूर जिल्ह्यात बार्शी तालुक्यातील सर्वाधिक २४४ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाल्याबद्दल सर्व विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक व अधिकारी यांचे आमदार राजाभाऊ राऊत यांनी अभिनंदन केले.
त्याचबरोबर त्यांनी ३५ वर्षानंतर बार्शी नगरपालिका शाळेतील विद्यार्थीही शिष्यवृत्तीधारक झाल्याने, त्या शाळेचेही विशेष अभिनंदन केले. भविष्यात बार्शी नगर पालिकेच्या शाळांची व इतर शाळांची गुणवत्ता अधिकाधिक वाढीसाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक असल्याचे सांगून, त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक औंदुंबर उकीरडे, गट शिक्षणाधिकारी लक्ष्मीकांत जाधव, बार्शी नगर पालिका शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे, सुयश विद्यालयाचे संस्थापक शिवदास नलवडे उपस्थित होते.
More Stories
कर्मवीर विद्यालय चारे येथे चित्रकला मार्गदर्शन शिबिर
महाराष्ट्र विद्यालयात शिक्षक – पालक मेळावा उत्साहात संपन्न
नियोजन भवन येथे 7 ऑगस्ट रोजी “Soulful सोलापूर” उपक्रमांतर्गत पर्यटन विकास कार्यशाळेचे आयोजन