आमदार राजाभाऊ राऊत यांच्या आमदार निधीतून, बार्शी शहरातील लिंगायत समाज बांधवांच्या तीन समाज मंदीराचे भूमिपूजन समारंभ संपन्न झाला.
बार्शी शहरातील मनगिरे मळा, अंधारे प्लॉट, उपळाई रोड अशा विविध भागात आमदार निधीतून २० लाख रुपये किंमतीच्या नव्याने बांधण्यात येणारे श्री वीरशैव नगरकर गवळी समाज मंदिर, तसेच १४ लाख रुपये किंमतीचे लिंगायत तेली समाज मंदिर व १७ लाख रुपये किंमतीचे लिंगायत माळी समाज मंदिर अशा एकूण ५१ लाख रुपये किंमतीच्या वीरशैव लिंगायत समाज मंदिराचे भूमिपूजन आमदार राजाभाऊ राऊत व मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी माजी नगराध्यक्ष विश्वासभाऊ बारबोले, नगराध्यक्ष ॲड. आसिफभाई तांबोळी, मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब कथले, वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष व नगरसेवक विलास आप्पा रेनके, प्रशांत कथले मालक, रावसाहेब मनगिरे मालक, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, माजी नगरसेवक नागजी भाऊ नान्नजकर, भारत पवार सर व लिंगायत तेली समाज बांधव, लिंगायत गवळी समाज बांधव, लिंगायत माळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निधी उपलब्ध करून देण्यात आलेली समाजमंदिरे
वीरशैव लिंगायत गवळी समाज मंदिर,बार्शी
वीरशैव लिंगायत तेली समाज मंदिर,बार्शी
वीरशैव लिंगायत माळी समाज मंदिर,बार्शी
More Stories
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम 2.0 विशेष आरोग्य तपासणी मोहिमेचा शुभारंभ
आमदार निवास व्यवस्था समितीच्या अध्यक्षपदी आमदार सचिन कल्याणशेट्टी