पूर्वीच्या दोन पदरी रस्त्याचे रूपांतर करून नव्याने तीन पदरी रस्त्या होणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र त्यांनी दिली. ८४ कोटी रुपये खर्चून सदरचे ७३ किलोमीटरचे काम पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. औरंगाबादच्या संत सतरामदास इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने या कामाचे टेंडर घेतलेले असून, दोन वर्षात हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
मागील दोन ते चार वर्षापासून सदरचे काम रखडले होते, हे काम लवकरात लवकर सुरू होण्यासाठी आमदार राजेंद्र राऊत यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री मा. नितीनजी गडकरी साहेब यांची भेट घेऊन पत्रव्यवहार केला होता. यावेळी मा. गडकरी साहेबांनी लवकरच या कामास सुरुवात करण्यात येईल असे आश्वासन दिले होते.
बार्शी तालुक्याला जोडण्यात येणाऱ्या इतर तालुके व जिल्ह्याचे दळणवळणाच्या रस्त्याचे जाळे, त्याचप्रमाणे बार्शी तालुक्यातील गावांना एकमेकांशी जोडणारे रस्ते करण्यासाठी आवश्यक असलेल्या निधीसाठी आमदार राजेंद्र राऊत हे केंद्र सरकार व राज्य सरकारच्या सतत संपर्कात राहून प्रयत्नशील आहेत. मागील अडीच वर्षांच्या त्यांच्या आमदारकीच्या काळात त्यांनी बार्शी शहर व तालुक्यातील रस्त्यांकरता केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक कोटींचा निधी उपलब्ध करून घेतला असून अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे पूर्णत्वाकडे गेली आहेत व अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत.
यावेळी माजी नगराध्यक्ष ॲड. आसिफभाई तांबोळी, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती अनिल काका डिसले, जिल्हा परिषद सदस्य मदन दराडे, प्रशांत कथले, विलास आप्पा रेणके, सुभाष शेठ लोढा, विजय नाना राऊत, प्रोजेक्ट मॅनेजर एस.पी. शास्त्री आदी मान्यवर उपस्थित होते.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद