UIDAI ने प्रिंटर वर तयार करण्यात येणाऱ्या पीव्हीसी आधार कार्डला (PVC Aadhaar card) अमान्य घोषित केलं आहे. बाजारात तयार करण्यात येत असलेलं पीव्हीसी आधार कार्ड (PVC Aadhaar Card) अमान्य असल्याची माहिती UIDAI ने ट्विट करून दिली आहे.
मागील काही वर्षांपासून प्रिंटर वरती बनवून घेतलेले pvc किंवा लॅमिनेट केलेले आधार कार्ड मोठ्या प्रमाणात वापरली जात होती कारण प्लास्टिक पासून बाणवली गेली असल्याने मुळे जास्त काळ टिकणारी होती
आता UIDAI स्वतःच PVC Aadhaar कार्ड बनवले आहे व आता हे PVC Aadhaar Card केवळ UIDAI वरुनच ऑर्डर करता येणार आहे. एटीएम कार्डच्या आकाराचं असल्याने ते खिशात किंवा पर्समध्ये सहजपणे बाळगता येत. यामध्ये सुरक्षिततेचे अनेक फीचर्स (Aadhaar PVC card security features) असतात
UIDAI वरुन कसे डाउनलोड कराल PVC Card?
या वेबसाइटवरुन PVC कार्ड ऑर्डर करू शकता. त्यासाठी UIDAI वेबसाइटवर My Aadhaar वर क्लिक करा. त्यानंतर Order Aadhaar PVC Card लिंकद्वारे तुम्ही ऑर्डर करू शकता. 50 रुपये प्रति ऑर्डर फी देऊन ऑनलाइन पीव्हीसी आधार कार्ड मागवता येतं. UIDAI ने ऑर्डर करण्यासाठी कोणतीही लिमिट ठरवलेली नाही. स्पीड पोस्टद्वारे PVC Aadhaar Card मिळेल. कोड स्कॅन करून ऑनलाइन PVC आधार कार्ड ऑर्डर करता येऊ शकतं.
आज प्रत्येक भारतीय नागरिकासाठी आधार कार्ड अतिशय महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. शासकीय कामांसाठी प्रत्येक खासगी कामासाठीही आधार कार्डची गरज असते. बाजारात सहजपणे PVC Aadhaar Card उपलब्ध आहे. परंतु आता UIDAI ने बाजारात बनवून मिळणारं PVC आधार कार्ड अमान्य ठरवलं आहे. अशा प्रकारच्या आधार कार्डमध्ये सुरक्षा फीचर्स नसतात, ते असुरक्षित असतात. त्यामुळे UIDAI ने आता खुल्या बाजारातून पीव्हीसी आधारच्या कॉपीचा वापर न करण्याचा सल्ला दिला आहे. जर तुम्ही पीव्हीसी आधार कार्ड आपल्या जवळच्या दुकानातून बनवले असेल, तर ते बदला आणि नव्या आधार कार्डसाठी UIDAI मध्ये अर्ज दाखल (Aadhaar card apply) करा.
UIDAI च्या म्हणण्यानुसार, uidai.gov.in वरून डाउनलोड करण्यात आलेले आधार किंवा आधार लेटर किंवा एम-आधार (M-Aadhaar) प्रोफाइल किंवा UIDAI कडून जारी करण्यात आलेले आधार पीव्हीसी कार्ड त्याद्वारेच आधार कार्ड (Aadhaar Card) शी संबंधित कामामध्ये वापर केला जाऊ शकतो.
More Stories
राज्यात १५ ऑक्टोबर रोजी साजरा होणार ‘वाचन प्रेरणा दिन’
धाराशिव विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ समिती प्रमुखांनी दिले प्रशिक्षण
बार्शी येथे चर्मकार समाज वधूवर सुचक मेळावा संपन्न