शुक्रवार दि.11/03/2022 रोजी सकाळी 10.45 वा इ.10 वी च्या 28 व्या बॅच चा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे मा.श्री मोहन लोहार-सर (संस्था प्रतिनिधी) तर अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री.व्हि.डी.क्षीरसागर-सर हे होते.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी छान मनोगते व्यक्त केली.10 वी वर्गशिक्षक श्री.आर.ए.शिंगण-सर,श्री.नरूटे-सर,प्रा.श्री.माने-सर यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.श्री.मोहन लोहार-सरांनी विद्यार्थ्यांना परीक्षेस शुभेच्छेसह सखोल मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणातून श्री.व्हि.डी. क्षीरसागर सर यांनी विविध जीवनकौशल्याचे अधिकच्या पैलू बाबतची माहिती कथन केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कु.वैष्णवी कदम व कु.अलिशा सय्यद यांनी संयुक्तिकपणे केले तर आभाराचे काम कु.अलिशा सय्यद हिने केले.
अल्पोपहारानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. याप्रसंगी सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद कार्यक्रमास उपस्थित होते.
More Stories
यशवंत विद्यालय खांडवी ता. बार्शी तील विद्यार्थ्यांची विधानभवनाला अभ्यास भेट, लोकशाहीच्या कार्यप्रणालीचा घेतला अनुभव
शाकंभरी नवरात्रोत्सवात आकाशात अवतरली भवानी माता; ३०० ड्रोनने साकारला भक्तीचा अद्भुत सोहळा
नव्या वर्षात महिलांसाठी कौशल्यपूर्ण संवाद सक्षमीकरणावर भर देणार – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे