अभिनव माध्य.व उच्च माध्य. विद्यालय,बार्शी प्रशालेत २६/११ शहीद स्मृती व संविधान दिन साजरा करण्यात आला.
प्रशालेत आज रोजी संविधान वाचन, संविधानिक घोषणा, संविधानाचे महत्व, संविधानाविषयी सर्व आवश्यक माहिती विद्यार्थी-विद्यार्थिनींना देण्यात आली.
२६/११ च्या भ्याड अतिरेकी हल्ल्यात “वीरमरण आलेल्या सर्व शहिदांना आदरपूर्वक श्रध्दांजली” वाहण्यात आली.
“संविधान दिन” निमित्ताने प्रशालेत इ.५ वी ते इ.१० वी च्या विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये लहान-मोठ्या गटाद्वारे रांगोळी, चित्रकला, निबंधलेखन, वक्तृत्व, घोषवाक्य, स्वरचित काव्यलेखन, फलकलेखन असे बरेच उपक्रम राबवण्यात आले.
उपक्रमासाठी प्रशाला-प्राचार्य श्री.व्हि.डी.क्षीरसागर-सर प्रमुख मार्गदर्शक होते. सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी सर्व उपक्रम पार पाडले
अशी माहिती प्रसिद्धि विभाग प्रमुख श्री.संतोष घावटे-सर यांनी दिली
More Stories
व्हॉईस ऑफ मीडिया बार्शीच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कुलदीप जंगम साहेब यांचे जिल्हा स्तरीय किशोरी मेळाव्यात विविध विषयांवर हितगुज
वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमांतर्गत महाविद्यालयांचा उर्त्स्फुत प्रतिसाद