ह.भ.प. सोपानकाका केळे औद्योगिक प्रशिक्षण संस्था, केळेवाडी येथे प्रमोद महाजन कौशल्य आणि उद्योजकता विकास अभियानांतर्गत आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा शुभारंभ आभासी पद्धतीने देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज दि.२० सप्टेंबर २०२४ रोजी आभासी पद्धतीने संपन्न झाला. या विकास केंद्राचा लाभ आसपासच्या परिसरातील सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व महावितरणचे माजी संचालक डॉ.मुरहरी केळे यांनी केले आहे. सदर कार्यक्रमासाठी वाशी व भूम तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी उपस्थित होते.
वर्धा येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना अशा अनेक योजनांसह बऱ्याच योजनांचे उद्घाटन केले.
ह भ प सोपान काका केळे औद्योगिक प्रशिक्षण संस्था केळेवाडी येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमास वाशी नगरपंचायत च्या नगराध्यक्ष श्रीमती विजयाताई गायकवाड, माजी जिल्हा परिषद सभापती श्री.उघडे, उद्योगपती विनोद जोगदंड यांचे सह अनेक शाळा महाविद्यालयाचे प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक वृंद व सातशे पेक्षा जास्त विद्यार्थी आणि केळेवाडी व वाशी परिसरातील अनेक गावकरी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमास भरघोस प्रतिसाद मिळाल्यामुळे कौशल्य विकास विभागाचे आयुक्त श्री. संजय गुरव यांनी संस्थेचे व प्राचार्य श्री. प्रदीप जोगदंड यांचे अभिनंदन केले आहे. सदर कार्यक्रम अत्यंत कमी वेळात यशस्वी करण्यासाठी श्री. गणेश मिसाळ, संस्थेचे सचिव श्री. तानाजी खांडेकर, संचालक श्री.अजिंक्य केळे यांचेसह श्री धावारे, श्री शिंदे यांनी अथक प्रयत्न केले.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सूचना: केवायसी प्रक्रिया तातडीने करा!