लायन्स इंटरनॅशनल ची विभागीय परिषद सोलापूर येथे लायन्स इंटरनॅशनल चे विभागीय सभापती राजेंद्र शहा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या परिषदेचे उद्घाटन लायन्स इंटरनॅशनल चे प्रांतपाल भोजराज नाईक निंबाळकर यांच्या हस्ते झाले यावेळी प्रथम उपप्रांतपाल ॲड एम के पाटील द्वितीय उपप्रांतपाल वीरेंद्र चिखले माजी प्रांतपाल राजशेखर कापसे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या परिषदेचे चेअरमन माजी प्रांतपाल अशोक मेहता हे होते.
विभागीय परिषदेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध डॉक्टर विठ्ठल लहाने यांचे लायन्स सभासदांना मार्गदर्शन लाभो या लायन्स इंटरनॅशनलच्या विभागीय परिषदेमध्ये उपक्रम राबवले गेले या वर्षांमध्ये सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या लायन्स पदाधिकाऱ्यांचा सन्मानही करण्यात आला या परिषदेत बेस्ट क्लब, बेस्ट अध्यक्ष, अनेक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले यामध्ये ॲड विकास जाधव यांना बेस्ट झोन चेअरमन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
ॲड विकास जाधव यांनी सन 2019 साली लायन्स चे सभासद झाल्यापासून लायन्स क्लब बार्शीचे अध्यक्ष व रिजन सेक्रेटरी पदावर उत्कृष्ट कार्य केले आहे यापूर्वी जाधव यांना बेस्ट प्रेसिडेंट, बेस्ट क्लबसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत याही वर्षी विभागात झोन चेअरमन पदावर उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल बेस्ट झोन चेअरमन या पुरस्काराने सन्मान केला आहे.
यावेळी माजी प्रांतपाल व्यंकटेश यजुर्वेदी,जगदीश पुरोहित, प्रभुध्दचंद्र झपके, गुलाबचंद शहा जितेंद्र माढेकर अरविंद कोनशिरसगी गुलाबचंद कासलीवाल ॲड विकास जाधव अमिता कारंडे गोविंदप्रकाश लाहोटी अमर काळे प्रकाश कुरडे धनाजी चव्हाण चंद्रकांत यादव अमित ध्रुपद शिवशरण खुबा यांची व्यासपीठावर उपस्थिती होते डॉक्टर विठ्ठल लहाने यांच्या मार्गदर्शनामुळे व सदर पुरस्कारामुळे आणखी ज्यादा काम करण्याची ऊर्जा मिळेल व निश्चितपणाने प्रत्येक पदाला न्याय देण्याची भूमिका असेल असे यावेळी विकास जाधव यांनी सांगितले.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सूचना: केवायसी प्रक्रिया तातडीने करा!