Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > वखारिया विद्यालयात कर्मवीर डाॅ.मामासाहेब जगदाळे जयंतीनिमित्त धीरज शेळके यांचे व्याख्यान संपन्न

वखारिया विद्यालयात कर्मवीर डाॅ.मामासाहेब जगदाळे जयंतीनिमित्त धीरज शेळके यांचे व्याख्यान संपन्न

वखारिया विद्यालयात कर्मवीर डाॅ.मामासाहेब जगदाळे जयंतीनिमित्त धीरज शेळके यांचे व्याख्यान संपन्न
मित्राला शेअर करा

बार्शी, उपळे-दुमाला-येथील श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित वखारिया विद्यालयात कर्मवीर डाॅ.मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कर्मवीर जयंती सप्ताह व्याख्यान मालेत धीरज शेळके यांचे “प्रसार माध्यमे आणि आजची मुले” या विषयावर वास्तववादी मार्गदर्शन झाले.

     प्रारंभी मा.मुख्याध्यापक,प्रमुख पाहुणे धीरज शेळके यांचे हस्ते बहुजनांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि डाॅ.मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

या वेळी मा.धीरज शेळके यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक दयानंद रेवडकर यांनी शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.तर जेष्ठ शिक्षक शंकर शिंदे यांनी मुख्याध्यापक यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षक श्री.वैद्य यांनी केले तर शिंदे व्ही.व्ही. यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.

या वेळी बोलताना प्रमुख पाहुणे मा.धीरज शेळके यांनी आजची तरुण मुले कशा प्रकारे शोशल मीडिया च्या आहारी गेली आहेत हे सांगतानाच शोशल मीडिया काळाची गरज जरी असली तरी आपण मीडिया चा वापर योग्य आणि आवश्यक त्या वेळी करायला हवा. शोशल मीडियाचे जसे फायदे आहेत तसे तोटे आहेत हे स्पष्ट करतानाच "आपणास आपल्या माणसात राहून आनंदी जीवन जगायचे असेल तर मोबाईल चा वापर कमी करावा "असे आवाहन केले.

अध्यक्षीय भाषणा नंतर सहशिक्षक सदाशिव सोनके यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी विद्यालया च्या सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती तवले यांनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. पूनम जुनवनकर, कु.समृद्धी ठोंगे या विद्यार्थिनींनी केले.