पणन मंत्रालय महाराष्ट्र शासन यांच्या वतीने कृषि उत्पन्न बाजार समिती बार्शी चा कारभार पाहण्यासाठी अशासकिय समितीची नेमणूक केली आहे. सदर अशासकिय समितीच्या अध्यक्ष पदी (मुख्य प्रशासक) मा. विजय (नाना) राऊत यांची तर प्रशासक म्हणून श्री. शाहुराजे संतोष निंबाळकर व श्री. ओंकार नानासाहेब धायगुडे यांची निवड करण्यात आली.

गुरुवार दिनांक २९/०८/२०२४ रोजी दुपारी ०४.०० वाजता मुख्य प्रशासक व प्रशासक यांनी आपला पदभार स्विकारला.
त्यानिमित्त कृषि उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कार्यालयामध्ये सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

सदर सत्कार समारंभामध्ये बाजार समितीचे सचिव श्री. टी. ए. जगदाळे व कर्मचारी, बाजार आवारातील सर्व आडत्ये-व्यापारी, हमाल, तोलार, चाळणी कामगार व शेतकरी बांधव यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे माजी संचालक, माजी नगरसेवक, माजी. पंचायत समिती सदस्य व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
More Stories
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
जी. डी. सी. अँन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदवाढ
संत गोरोबाकाका मंदिराची प्रस्तावित नवीन कमान महाद्वाराची जागा बदलण्याची तेर ग्रामस्थांची मागणी