राज्यात यंदा चांगला पाऊसकाळ असून ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातील अनेक धरणे भरली आहेत. सोलापूर जिल्ह्याची जीवनदायिनी उजनी धरणंही ओव्हरफ्लो झालं आहे. त्यामुळे, मुसळधार पर्जन्यवृष्टीचा परिणाम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांवर झाला आहे.
बाजार समिती निवडणूक शेतकऱ्यांशी संबंधित असल्याने सध्याची पावसाची पूरस्थिती लक्षात घेऊन पणन विभागाने 30 सप्टेंबरपर्यंत बाजारसमित्यांची निवडणूक पुढे ढकलली आहे. त्यामुळे, बार्शी कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूकही पुढे ढकलण्यात आली आहे
बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपुष्टात आली आहे. त्यामुळे, यासाठी लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार होता. त्यासाठी, निवडणूक प्रारुप याद्याही बनवण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी यावरील हरकती मंजूर व नामंजूरही करण्यात आल्या. मात्र, आता, 30 सप्टेंबर पर्यंत ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.
More Stories
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सूचना: केवायसी प्रक्रिया तातडीने करा!
बार्शी येथे मनशक्ती प्रयोग केंद्राची आरोग्यप्राप्ती, रोगमुक्ती कार्यशाळा संपन्न