शिवशंभू संघटना युवती जळगांव जिल्हा अध्यक्षा कुमारी कविता ज्ञानेश्वर पाटील यांनी आपल्या आईच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांनी आईच्या स्मृतीस अभिवादन करून आपल्या आईच्या नावाने ” हिराई फाऊंडेशन ” या नावाने नवीन सामाजिक कार्यास सुरुवात केली.

आपल्या आईच्या स्मृतिदिनी त्यांनी आपल्याला जन्म देऊन केलेल्या उपकाराची जाण ठेऊन आपल्या आईच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणून त्यांनी धायरी येथील सूर्योदय वृद्धाश्रमात अन्नदान करून वृद्ध आश्रमातील महिलांना घास भरवत वृद्ध आश्रमातील वृद्ध महिलासोबत आपला दिवस घालवला.
आई नसल्याची कमी आई गेल्यावर कळते जेव्हा आपल्या आईबद्दल काही आठवणी वृद्ध महिलांना सांगितल्या तेव्हा वृद्ध आजीचे अश्रू अनावर झाले. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमा चे सूर्योदय वृद्धाश्रम चे संस्थापकीका छाया ताई भगत, राधाताई लाटे यांनी कविता पाटील यांचे आभार मानून कौतुक केले.
More Stories
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
जी. डी. सी. अँन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदवाढ