बार्शी:- समाजात कान असूनही जाणीवपूर्वक चांगल्या गोष्टी न ऐकणारे, नि तोंड असूनही जाणीवपूर्वक न बोलणारे हेच खरे कर्णबधीर असतात, असे मत लेखक सचिन वायकुळे यांनी व्यक्त केले.
इंडीयन रेडक्रॉस संचलित बधीरमुख विद्यालयात टपाल तिकीट संग्राहक उदय पोतदार यांनी जागतिक कर्णबधीर दिनानिमित्त ४१ देशातील पोस्ट तिकीट प्रदर्शन आयोजित केले होते.
याप्रसंगी वायकुळे बोलत होते. व्यासपीठावर संस्थेचे सचिव संतोष सुर्यवंशी, उद्योजक धीरज कुंकुलोळ, उदय पोतदार, सुनील फल्ले, सायरा मुल्ला, मुख्याध्यापक मुळे उपस्थित होते.
जीवनात आपल्या वाट्याला पैसा यावा, संपत्ती यावी असे प्रत्येकाला वाटते. यामुळे माणूस श्रीमंत होईल, मात्र पैशांपेक्षा जीवन समृध्द करणारे आई वडील वाट्याला यायला हवेत, असे सांगून या मुलांच्या कलागुणांचे वायकुळे यांनी कौतुक केले.यावेळी निबंध स्पर्धेतील विजेत्या मुलांना पारितोषिक देण्यात आले.
यावेळी पोतदार, मुल्ला, शिक्षक गवारे यांनी मनोगत व्यक्त केले. शिक्षिका मंजुषा काटकर यांनी प्रास्तविक केले तर मुख्याध्यापक मुळे यांनी आभार मानले.
More Stories
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
दीपस्तंभ नाटकामुळे नावलौकिक मिळाला आणि मी घडलो- डॉ गिरीश ओक