Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > कृषी व पशुसंवर्धन > दीक्षारंभ कार्यक्रमाअंतर्गत कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कृषि महाविद्यालय बार्शी येथील विद्यार्थ्यांच्या कृषि संशोधन केंद्रांना भेटी

दीक्षारंभ कार्यक्रमाअंतर्गत कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कृषि महाविद्यालय बार्शी येथील विद्यार्थ्यांच्या कृषि संशोधन केंद्रांना भेटी

दीक्षारंभ कार्यक्रमाअंतर्गत कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कृषि महाविद्यालय बार्शी येथील विद्यार्थ्यांच्या कृषि संशोधन केंद्रांना भेटी
मित्राला शेअर करा

कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कृषि महाविद्यालय, बार्शी मधील विद्यार्थ्यांनी, सोलापूर येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, विभागीय कोरडवाहू कृषि संशोधन केंद्र, शासकीय कृषि तंत्र विद्यालय आणि कृषि विज्ञान केंद्र येथे नवीन राष्ट्रीय शैक्षणीक धोरण-२०२० नुसार दीक्षारंभ या कार्यक्रमाअंतर्गत भेटी दिल्या.

राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रातील कृषि शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ पोखरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत राष्ट्रीय डाळिंब संशोधनाचा इतिहास, कार्यालयाचे कामकाज, डाळिंबाचे नवीन वाण, डाळिंबाचे रोग व कीड व्यवस्थापन याची सविस्तर माहिती दिली. दरम्यान या संशोधन केंद्राकडे विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक सहल म्हणून न पाहता येथे मिळणाऱ्या ज्ञानाचा वापर त्यांच्या शेतात करावा, असे आवाहन केले.

विभागीय कोरडवाहू कृषि संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ व सहयोगी संशोधन संचालक डॉ. एन. जे. रणशूर यांनी सदर केंद्रामध्ये राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांविषयी सविस्तर माहिती दिली व बहुमोल मार्गदर्शन केले तसेच शासकीय कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. जाधव जे. डी. यांनी विद्यार्थ्यांना कृषि तंत्र विद्यालयात राबिवण्यात येणाऱ्या उपक्रमांची व दैनंदिन कामकाजाची माहिती दिली.

कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ श्री. पी. ए. गोंजारी यांनी केव्हीकेच्या कार्याबद्दल, लॅबमधील कृषि तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्या संबंधीची कार्यपध्दती व कृषि विज्ञान केंद्राची गरज याबाबत मार्गदर्शन केले.

अभ्यास दौऱ्याचे नियोजन, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्याक्ष श्री एन. एन. जगदाळे, सचिव श्री. पी. टी. पाटील, सहसचिव श्री. ए. पी. देबडवार, खजिनदार श्री जे. सी. शितोळे व प्रभारी प्रायार्च श्री पी. आर. गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. बोनगे व्ही. ई., डॉ. शेंडे एस. एस. आणि डॉ. कु. बर्गे एम. सी. यांनी केले व सर्व विद्यार्थ्यांनी दीक्षारंभ कार्यक्रमात सहभाग नोंदविला.