कोरोनाच्या महामारीमुळे गेल्या अडीच वर्षांपासून शाळा बंद होत्या. अखेर 4 ऑक्टोबरपासून शाळा (Maharashtra school reopen from 4 October) सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. पण, ‘विद्यार्थ्यांना शाळेत हजर राहण्याची सक्ती नाही. पालकांच्या संमतीशिवाय विद्यार्थ्यांनी शाळेत येऊ नये, कोरोनाची संपूर्ण खबरदारी घेऊनच विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे, असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (varsha gaikwad) यांनी स्पष्ट केलं आहे.

राज्यातील शाळा अखेर सुरू (Maharashtra School reopen) करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार आता येत्या 4 ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत.
शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता मिळाली आहे. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत वर्षा गायकवाड यांनी संपूर्ण नियमावली वाचून दाखवली आहे

More Stories
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
आमदार निवास व्यवस्था समितीच्या अध्यक्षपदी आमदार सचिन कल्याणशेट्टी
कुष्ठरुग्ण शोध अभियान व स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान प्रभाविपणे राबवा