Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > बार्शी शहर व तालुक्याच्या पर्यावरणाची सदृढतेकडे वाटचाल;पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतली दखल.

बार्शी शहर व तालुक्याच्या पर्यावरणाची सदृढतेकडे वाटचाल;पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतली दखल.

मित्राला शेअर करा

वृक्ष प्रेमी आमदार राजाभाऊ राऊत यांच्या नेतृत्वाखाली बार्शी शहर व तालुक्याच्या पर्यावरणाची सदृढतेकडे वाटचाल.तसेच सामाजिक संस्थांचा उस्फूर्त सहभाग.

या कार्याची दखल पर्यावरण मंत्री मा.आदित्यजी ठाकरे यांनी घेतली आहे व पर्यावरण संवर्धनासाठी जागतिक रेस टू झिरो अभियानात सहभागी होण्यासाठी बार्शी शहराला नामांकन दिले आहे.

आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली बार्शी नगरपरिषदेच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासाठी केलेल्या कामाची दखल घेत पर्यावरण मंत्रालय महाराष्ट्राने पर्यावरण संवर्धनासाठी जागतिक रेस टू झिरो अभियानात सहभागी होण्यासाठी बार्शी शहराला नामांकन दिले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियान स्पर्धा २०२१ मध्ये,बार्शी नगरपरिषदेने महानगरपालिका गटामध्ये उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले आहे.

बार्शी शहरातील वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनासाठी बार्शी नगर परिषद,वृक्ष प्रेमी नागरिक, सामाजिक संघटना आदींच्या सहकार्याने हरित बार्शी करण्यास मदत होत आहे. भाजप-सेना युती सरकारच्या काळात शासनाने राबविलेले १ कोटी वृक्ष लागवड अभियान राबवित असताना,आज पर्यंत बार्शी शहर,तालुक्यात सतत वन विभाग व वृक्ष प्रेमी नागरिकांच्या बैठका घेऊन त्या माध्यमातून वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनासाठी प्रोत्साहन व जनजागृती करण्यात आली.यामुळेच बार्शी नगर परिषदेस माझी वसुंधरा स्पर्धा २०२१ मध्ये पारितोषिक मिळाले.

आता जागतिक रेस टू झिरो अभियानात सहभागी झाल्यामुळे निश्चितच आपल्या सर्व वृक्ष प्रेमी व पर्यावरण प्रेमी नागरिकांची जबाबदारी वाढली आहे. या स्पर्धेच्या मार्गदर्शक सूचनांच्या माध्यमातून,सर्व बार्शीकर नागरिकांच्या सहभागातून या स्पर्धेत आपण नक्कीच पारितोषिक मिळवू असा मला आत्मविश्वास आहे.

महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री मा. आदित्य ठाकरे यांनी जागतिक रेस टू झिरो स्पर्धेसाठी बार्शी शहराला नामांकन दिल्याबद्दल, आमदार राजेंद्र राऊत यांनी लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांचे आभार व्यक्त केले.